कराड हादरलं! भाच्याने भरचौकात मामावर चाकूने केले वार, हल्ल्यात मामाचा दुर्दैवी अंत

Karad Crime : मामा-भाच्यात झालेल्या वादातून भाच्याने आपल्या मामावर चाकूने वार करत खून केल्याची घटना घडली आहे.

karad crime

karad crime

मुंबई तक

13 Dec 2025 (अपडेटेड: 13 Dec 2025, 02:12 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भर चौकात भाच्याने मामावर चाकूने केले सपासप वार

point

उपचार सुरु असताना मामाचा मृत्यू 

Karad Crime : कराड तालुक्यातील ओगलेवाडी या गावात भरदिवसा मामा-भाच्यात मोठा वाद झाला होता. याच वादातून भाच्याने आपल्या मामावर चाकूने वार करत संपवल्याची घटना समोर आली आहे. जखमी असलेल्या मामाला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, गुरुवारी रात्री उपचार सुरु असताना त्याचा दुर्दैवी अंत झाला. या प्रकरणातील मृत मामाचे नाव आता समोर आले आहे. शेखर उर्फ बाळू प्रकाश सुर्यवंशी (वय 31) असे खून करण्यात आलेल्या मामाचे नाव आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, 'या' राशीतील लोकांच्या प्रेम जीवनात रोमांचक बदल होईल, तर काहींना..

भर चौकात भाच्याने मामावर चाकूने केले सपासप वार

मृत व्यक्ती शेखर बाळू सूर्यवंशी याच्यावर गुन्हा होता. गुरुवारी दुपारी ओगलेवाडी येथील भर चौकात भाचा आणि मामा शेखर सूर्यवंशी यांच्यात वाद झाला होता. पण, काही क्षणांतच परिस्थिती बदलल्याचे बघता, भाच्याने मामावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात शेखर सूर्यवंशी गंभीररित्या जखमी झाल्याचे दिसून आला होता.

या घटनेची एकूण माहिती मिळताच निरीक्षक राजेश माळी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणातील जखमी मामा शेलारला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सायंकाळी सहा वाजता त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

हे ही वाचा : एक्स्प्रेसवर कारमधील कपलचा अश्लील व्हिडीओ व्हायरल... तुमच्यावर अशी परिस्थिती ओढवल्यास आधी 'हे' करा

उपचार सुरु असताना मामाचा मृत्यू 

शेखर सूर्यवंशीवर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    follow whatsapp