एक्स्प्रेसवर कारमधील कपलचा अश्लील व्हिडीओ व्हायरल... तुमच्यावर अशी परिस्थिती ओढवल्यास आधी 'हे' करा

मुंबई तक

कपलचा खाजगी व्हिडिओ त्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन किंवा आक्षेपार्ह वेबसाइटवर अपलोड झाल्यास कोणते कायदेशीर पर्याय आणि कारवाई केली पाहिजे? याबाबत सविस्तर जाणून घ्या.

ADVERTISEMENT

अशी परिस्थिती ओढवल्यास आधी 'हे' करा
अशी परिस्थिती ओढवल्यास आधी 'हे' करा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एक्स्प्रेसवर कारमधील कपलचा इंटिमेट व्हिडीओ व्हायरल...

point

तुमच्यावर सुद्धा अशी परिस्थिती ओढवल्यास आधी 'हे' करा

Crime News: उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर घडलेल्या एका घटनेने लोकांच्या प्रायव्हसीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एक्सप्रेसवेवर एका कारमधील जोडप्याचे प्रायव्हेट आणि रोमॅन्टिक क्षण हाय-रेझोल्यूशन अँटी-ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (एटीएमएस) कॅमेऱ्यात कैद झाले. हा व्हिडिओ केवळ सोशल मीडियावर तर व्हायरल झालाच पण त्यासोबत बऱ्याच पोर्नोग्राफिक वेबसाइटवर देखील अपलोड केला गेल्याचं सांगितलं जात आहे. अशातच, कपलचा खाजगी व्हिडिओ त्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन किंवा पोर्नोग्राफिक वेबसाइटवर अपलोड झाल्यास कोणते कायदेशीर पर्याय आणि कारवाई केली पाहिजे? याबाबत सविस्तर जाणून घ्या. 

व्हिडीओ डिलीट करण्यासाठी नेमकं काय कराव? 

1. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेला व्हिडीओ डिलीट करण्यासाठी सर्वात आधी व्हिडिओ अपलोड केलेल्या प्लॅटफॉर्मच्या (जसे की पॉर्न वेबसाइट, सोशल मीडिया साइट किंवा मेसेजिंग अॅप) तक्रार म्हणजेच Complaint नियमाचा वापर करा.
2. सर्व प्रमुख वेबसाइट्समध्ये गैरवापराची म्हणजेच मिसयूजची तक्रार करा, कॉपीराइट उल्लंघन किंवा गोपनीयता (प्रायव्हसी) उल्लंघन अशा दिलेल्या पर्यायांमध्ये तुम्ही व्हिडिओची URL आणि गोपनीयता उल्लंघनाची माहिती देऊन व्हिडीओ त्वरित काढून टाकण्याची विनंती करू शकता. 
3. याव्यतिरिक्त, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) द्वारे चालवल्या जाणाऱ्या सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दाखल करा जेणेकरून सरकारी स्तरावर प्लॅटफॉर्मला व्हिडिओ काढून टाकण्यासाठी सूचना जारी करता येतील. 

हे ही वाचा: पतीचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् दिराने केला बलात्कार! सासरी महिला कॉन्स्टेबलसोबत भयानक प्रकार...

कायदेशीर प्रक्रिया काय? 

जर एखादा खाजगी व्हिडिओ व्हायरल झाला तर, पीडित व्यक्तीकडे अनेक कायदेशीर पर्याय असतात. सर्वप्रथम, तुम्ही सायबर क्राइम सेल किंवा स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी. माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायदा, 2000 च्या कलमांमध्ये हे समाविष्ट आहे. विशेषतः, कलम 66E मध्ये गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल कायदेशीर कारवाईची तरतूद आहे, ज्यामध्ये तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा आहे. जर व्हिडिओ अश्लील असेल तर कलम 67/67A (इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लील सामग्री प्रकाशित करणे) अंतर्गत देखील गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. पोलिस तक्रारी दरम्यान, व्हायरल व्हिडिओची लिंक, अपलोडरच्या खात्याची माहिती आणि सर्व संबंधित पुरावे पोलिसांना द्या जेणेकरून गुन्हेगारांची ओळख पटेल आणि त्यांना त्वरीत अटक करता येईल. 

हे ही वाचा: BMC Election: भाजपचा ‘हा’ सर्व्हे ठाकरेंसाठी सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा, मुस्लिम बहुल वॉर्डात भाजपला ‘No’, शिंदेंना ‘Yes’!

अशा घटना टाळण्यासाठी काय करावे? 

भारतीय संविधानानुसार गोपनीयतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीच्या खाजगी जीवनाशी संबंधित कोणतीही माहिती त्यांच्या संमतीशिवाय व्हायरल म्हणजेच सार्वजनिक करणे किंवा व्यावसायिकरित्या वापरणे बेकायदेशीर आहे. पीडित व्यक्ती व्हिडिओ डिलीट करण्याची आणि गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्याची तसेच दिवाणी न्यायालयात बदनामी आणि मानसिक छळासाठी भरपाईची मागणी करू शकतात. अशा घटना टाळण्यासाठी, लोकांना त्यांचे खाजगी क्षण रेकॉर्ड होत आहेत का? याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिले तसेच, कोणत्याही संशयास्पद लिंक्स किंवा सोशल मीडियावरील अज्ञात संदेश उघडणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp