BMC Election: भाजपचा ‘हा’ सर्व्हे ठाकरेंसाठी सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा, मुस्लिम बहुल वॉर्डात भाजपला ‘No’, शिंदेंना ‘Yes’!
BJP Survey: भाजपने नुकताच एक अंतर्गत सर्व्हे केला. ज्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबाबत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर.
ADVERTISEMENT

BMC Election
मुंबईः मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी भाजपने केलेल्या गोपनीय सर्व्हेने सत्ताधारी महायुतीतच मोठी खळबळ माजवली आहे. या सर्व्हेनुसार, मुंबईतील मुस्लिम बहुल भागात भाजप आणि भाजपच्या चिन्हाला थेट विरोध आहे, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाला आणि नेतृत्वाला मुस्लिम मतदारांकडून स्पष्ट पसंती मिळत आहे.
सर्व्हेतील महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबईत एकूण १८ वॉर्ड असे आहेत जिथे ७० टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत. या सर्व १८ वॉर्डात भाजप उमेदवाराला मुस्लिम समाजातून प्रबळ विरोध असल्याचे दिसते.
- मात्र याच १८ वॉर्डात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुस्लिम मतदार, विशेषतः महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळेल असा अंदाज आहे.










