अहो, मला भेटायला या, सौंदर्याची खाण असलेल्या DSP चा उद्योगपतीवर लव्ह ट्रॅप, चॅटींग सोशल मीडियावर व्हायरल!

dsp Kalpana verma businessman Deepak tandon love trap scandal : या कथित प्रेमसंबंधांची सुरुवात 2021 साली झाल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला ओळख आणि मैत्री, त्यानंतर वाढत गेलेली जवळीक आणि पुढे प्रेमसंबंध असा हा प्रवास असल्याचा दावा उद्योगपतीकडून करण्यात आला आहे. याच काळात विविध कारणे सांगून डीएसपीने आपल्याकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत आणि भेटवस्तू घेतल्याचे दीपक टंडन म्हणतात.

dsp Kalpana verma businessman Deepak tandon love trap scandal

dsp Kalpana verma businessman Deepak tandon love trap scandal

मुंबई तक

14 Dec 2025 (अपडेटेड: 14 Dec 2025, 03:24 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अहो, मला भेटायला या, सौंदर्याची खाण असलेल्या DSP चा उद्योगपतीवर लव्ह ट्रॅप,

point

चॅटींग सोशल मीडियावर व्हायरल!

DSP Kalpana verma businessman Deepak tandon love trap scandal  : गेल्या दोन–तीन दिवसांपासून सोशल मीडियावर छत्तीसगडमधील एका महिला डीएसपी आणि कोट्यवधी रुपयांचा उद्योगपती यांच्यातील कथित प्रेमसंबंधांची जोरदार चर्चा सुरू आहे. छत्तीसगड पोलिस दलात कार्यरत असलेल्या डीएसपी कल्पना वर्मा आणि उद्योगपती दीपक टंडन यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स, फोटो, व्हिडीओ आणि काही कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. सुरुवातीला प्रेमकहाणी म्हणून पाहिले जाणारे हे प्रकरण आता ‘लव्ह ट्रॅप’, आर्थिक फसवणूक आणि अधिकारांच्या गैरवापराच्या आरोपांमुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

हे वाचलं का?

या संपूर्ण प्रकरणात उद्योगपती दीपक टंडन स्वतः फसवणूक झाल्याचा दावा करत आहेत. त्यांनी पोलिसांकडे तक्रारीसाठी धाव घेतली असली, तरी अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, सोशल मीडियावर समोर आलेल्या चॅट्समुळे आणि आरोपांमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

दीपक टंडनने माध्यमांसमोर सादर केलेल्या कथित व्हॉट्सअ‍ॅप संभाषणांमध्ये डीएसपी कल्पना वर्मा त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत असल्याचे दिसते. तसेच, दीपकला पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “मला भेटायला या”, “पत्नीला घटस्फोट द्या”, “आपण एकत्र राहू”, “मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही” अशा आशयाचे संदेश चॅट्समध्ये असल्याचा दावा उद्योगपतीने केला आहे.

कल्पना वर्मा कोण आहेत?

दंतेवाडा जिल्ह्यात डीएसपी पदावर कार्यरत असलेल्या कल्पना वर्मा या सध्या वादा सापडल्या आहेत. उद्योगपती दीपक टंडनसोबतचे त्यांचे संबंध केवळ वैयक्तिक मर्यादेत न राहता आता गंभीर आरोपांच्या पातळीवर पोहोचले आहेत. दीपक टंडनने आरोप केला आहे की, नात्याचा गैरफायदा घेत डीएसपीने त्यांच्याकडून सुमारे दोन कोटी रुपये रोख, तसेच मौल्यवान वस्तू देखील उकळल्या आहेत.

नात्याची सुरुवात कशी झाली?

या कथित प्रेमसंबंधांची सुरुवात 2021 साली झाल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला ओळख आणि मैत्री, त्यानंतर वाढत गेलेली जवळीक आणि पुढे प्रेमसंबंध असा हा प्रवास असल्याचा दावा उद्योगपतीकडून करण्यात आला आहे. याच काळात विविध कारणे सांगून डीएसपीने आपल्याकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत आणि भेटवस्तू घेतल्याचे दीपक टंडन म्हणतात.

लीक झालेल्या चॅट्समधील आरोप

उद्योगपतीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी डीएसपीला टप्प्याटप्प्याने दोन कोटी रुपये रोख दिले. याशिवाय हिऱ्याची अंगठी, सोन्याची साखळी आणि एक महागडी कारही दिल्याचा आरोप आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, डीएसपीने आपल्या प्रभावाचा वापर करून दीपक टंडनच्या एका हॉटेलची नोंदणी आपल्या भावाच्या नावावर करून घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. या आरोपांमुळे प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून, डीएसपीच्या हेतूंवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोप आणि प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन सत्य काय आहे, हे अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, तोपर्यंत ही ‘लव्ह स्टोरी’ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत राहणार, हे मात्र निश्चित.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कल्याण : रॅपिडो बुक केली पण त्याने तरुणीला अंधाऱ्या ठिकाणी नेलं, अंतिप्रसंगाचा प्रयत्न, नागरिकांकडून चोप VIDEO

    follow whatsapp