Crime News: तरुणी किंवा महिलांचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असल्याच्या बऱ्याच बातम्या समोर येत असतात. मात्र, उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथून एक अजबच प्रकरण समोर आलं आहे. येथे एका महिलेने तिच्याच पतीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नव्हे तर, तिने तिच्या पतीला जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली. पीडित पतीने स्वत: आपल्या पत्नीविरुद्ध आरोप करत FIR दाखल केला आहे. पीडित तरुणाने सांगितलं की, त्या दोघांसंदर्भात कोर्टात एक केस सुरू आहे आणि त्यामुळेच पत्नीने पतीसोबत असं कृत्य केलं.
ADVERTISEMENT
पतीचे अश्लील फोटो केले व्हायरल
संबंधित प्रकरण हे गाजीपूरच्या मोहम्मदाबाद परिसरातील असून येथील रहिवासी असलेल्या सुनील (बदललेलं नाव) नावाच्या तरुणाने त्याच्या पत्नीसह पाच लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुनीलने केलेल्या आरोपानुसार, त्याची पत्नी वारंवार सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे अश्लील फोटोज व्हायरल करत आहे. नातेवाईकांनी सोशल मीडियावर त्याच्या अश्लील फोटोंबाबत सांगितलं असता त्याला या प्रकरणाची माहिती मिळाली.
हे ही वाचा: "शारीरिक संबंध अन् सिगारेटचे चटके..." तरुणीने प्रियकराच्या कृत्याबद्दल सगळंच सांगितलं! 'त्या' रात्री अचानक घरात घुसला अन्...
पत्नीने दिली जीवे मारण्याची धमकी
या प्रकरणाचा तपास केला असता हे घाणेरडं कृत्य त्याची पत्नीच करत असल्याचं समोर आलं. खरं तर, सुनील आणि त्याच्या पत्नीसंदर्भात कोर्टात एका केस सुरू असल्याची माहिती आहे. सुनील म्हणाला की, "जेव्हा मी माझ्या पत्नीला ते फोटो डिलीट करायला सांगितले तेव्हा तिने मला धमक्या देण्यास सुरुवात केली. ती म्हणाली की ती मला जीवे मारून टाकण्यासाठी गुंडांना सुपारी देईल आणि माझं कुटुंब उद्धवस्त करेल."
हे ही वाचा: ठाणे: तरुणीने रॅपिडो बाईक बुक केली अन् निर्जन ठिकाणी नेऊन चालकाचं नको ते कृत्य!
पत्नीसह 5 जणांवर गुन्हा दाखल
पीडित तरुणाच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्याचे सासरे, त्याच्या पत्नीच्या मामाचा मुलगा आणि लग्न लावून देणारा मध्यस्थ देखील या संपूर्ण घटनेत सामील असल्याचा त्याने आरोप केला. अशातच, पोलिसांनी तक्रारदाराच्या पत्नीसह एकूण 5 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. लवकरच आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी आश्वासन दिलं आहे.
ADVERTISEMENT











