Crime News: उत्तर प्रदेशातील हापूड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिसांना एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला होता. संबंधित तरुणीची बऱ्याच दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली असून आरोपीने तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला होता. खरं तर, तरुणीच्या त्या मृतदेहाचा सांगाडा झाला असल्याकारणाने पीडितेची ओळख पटवणं सुद्धा पोलिसांना शक्य नव्हतं. पुढे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली असता बऱ्याच धक्कादायक बाबी उघडकीस आल्या.
ADVERTISEMENT
व्यावसायिकाने पोलिसांना दिली माहिती...
हापूड पोलिसांनी सुरुवातीला पीडित तरुणीबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. ठोस माहिती मिळाली नसल्याने हापूड पोलिसांनी दिल्ली पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ही तरुणी दिल्ली-एनसीआरमधील असावी, असा हापूड पोलिसांना संशय आला. दरम्यान, दिल्लीतील एका व्यावसायिकाने पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की त्याच्या घरातील नोकराने संबंधित तरुणीची हत्या होताना पाहिली आहे.आ माहितीनंतर खळबळजनक प्रकरण उघडकीस आलं आणि त्यामुळे पोलिसांना सुद्धा मोठा धक्का बसला.
हत्येनंतर मृतदेह सूटकेसमध्ये भरला अन्...
व्यावसायिकाच्या माहितीनंतर, दिल्ली पोलीस आणि हापूड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर हे प्रकरण हापूडशी संबंधित असल्याचं दिसून आले. काळ्या सुटकेसमध्ये सापडलेला मृतदेह झारखंडमधील एका मुलीचा असल्याचं समोर आलं. 27 ऑगस्ट रोजी नोएडा येथे पीडित तरुणीची हत्या करण्यात आली आणि 29 ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून हापूडमधील एका शेतात फेकण्यात आला.
हे ही वाचा: "तुझं लग्न होऊ देणार नाही.." दाजीने मेहुणीला पाठवले अश्लील मॅसेज अन् विरोध केल्यास 'ती' धमकी!
दांडक्याने बेदम मारहाण करत हत्या
हापूडमधील रहिवासी असलेल्या अंकित आणि त्याची पत्नी यांनी झारखंडहून त्या तरुणीला आणलं होतं. अंकितने पीडितेला मोलकरीण म्हणून काम देण्याची व्यवस्था केली. त्यानंतर, ते काम करत ती अंकित आणि त्याच्या पत्नीसोबत त्यांच्या घरी राहू लागली. एके दिवशी, आरोपी अंकितने संधी साधून पीडितेसोबत बळबजबरीने लैंगिक संबंध ठेवले. घटनेदरम्यान त्याने तिचा अश्लील व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला. मुलीने विरोध केला आणि पोलिसात तक्रार करून त्याला त्याच्या पत्नीला तुरुंगात टाकणार असल्याचं सांगितलं. हे ऐकताच अंकित आणि त्याच्या पत्नीने तरुणीला दांडक्यांनी बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर, दोन्ही आरोपींनी पीडितेचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरला आणि तो हापूडमधील एका शेतात फेकून दिला.
हे ही वाचा: मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा, अर्ज भरण्याची तारीख, मतदान ते मतमोजणी संपूर्ण माहिती एका क्लिकवर
या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, "ही महिला दिल्ली-एनसीआरची असल्याचा आम्हाला संशय होता. व्यावसायिकाच्या मोकरणीने त्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर, मृत महिलेची माहिती मिळाली आणि अंकित तसेच त्याच्या पत्नीने केलेला या गंभीर गुन्हा उघडकीस आला. आता, दोन्ही पती-पत्नीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT











