मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा, अर्ज भरण्याची तारीख, मतदान ते मतमोजणी संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Maharashtra Mahapalika Elections announced by State Election Commission : एकूण महानगरपालिका 29 आहेत. त्यासाठी निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक खर्चाची मर्यादा पुढीलप्रमाणे..- अ वर्गसाठी - 15 लाख, ब वर्गसाठी 13 लाख, क वर्गसाठी 11 लाख आणि ड वर्गसाठी 9 लाख रुपये ...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा
अर्ज भरण्याची तारीख, मतदान ते मतमोजणी संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Maharashtra Mahapalika Elections announced by State Election Commission : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची निवडणूक आयोगाकाकडून घोषणा करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी (दि. 15 डिसेंबर 2025) दुपारी 4.00 वाजता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी यासंदर्भातील घोषणा करण्यात आली.
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025
नामनिर्देशन पत्राची छाणणी - 31 डिसेंबर 2025
अर्ज माघारी घेण्याची मुदत - 2 जानेवारी 2026










