राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं प्रमाण वाढलं; आता देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई तक

Devendra Fadnavis on Raj Thackeray : "लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे", असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते.

ADVERTISEMENT

 Devendra Fadnavis on Raj Thackeray
Devendra Fadnavis on Raj Thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं प्रमाण वाढलं;

point

आता देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी (दि.14) महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं प्रमाण वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एनसीआरबीच्या आकडेवारी सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल केले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या प्रश्नांना प्रत्युत्तर दिलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत काय म्हटलं होतं? आणि देवेंद्र फडणवीस प्रत्युत्तर देताना काय म्हणाले? हे सविस्तर जाणून घेऊयात..

राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी 

एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही...

लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ?

हेही वाचा : धक्कादायक... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावापासून जवळच सापडला 115 कोटींचा ड्रग्स साठा; क्राईम ब्रांचने 'असा' मारला छापा!

हे वाचलं का?

    follow whatsapp