अमोल मिटकरींची बदनामी केल्याप्रकरणी 4 युट्यूब पत्रकारांना 5 दिवसांचा तुरुंगवास; हक्कभंग प्रस्तावाचा इम्पॅक्ट

मुंबई तक

Maharashtra Politics : या प्रकरणात ‘सत्यलढा’ यूट्यूब चॅनलशी संबंधित पत्रकार गणेश सोनावणे, हर्षदा सोनावणे, अमोल नांदुरकर, अंकुश गावडे तसेच संपादक सतीश देशमुख यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर हा विषय विधानमंडळाच्या हक्कभंग व विशेषाधिकार समितीकडे चौकशीसाठी सोपविण्यात आला.

ADVERTISEMENT

Maharashtra Politics
Maharashtra Politics
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अमोल मिटकरींची बदनामी केल्याप्रकरणी 4 युट्यूब पत्रकारांना 5 दिवसांचा तुरुंगवास

point

हक्कभंग प्रस्तावाचा इम्पॅक्ट

Maharashtra Politics ,नागपूर : विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांची बदनामी केल्याच्या आरोपाखाली चार यूट्यूब पत्रकारांवर कारावासाची शिफारस झाल्याने राज्याच्या राजकीय व माध्यम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विधानमंडळाच्या विशेषाधिकार समितीने संबंधित प्रकरणाचा अहवाल सादर करत या चारही पत्रकारांना पाच दिवसांच्या कारावासाची शिक्षा देण्याची शिफारस केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार अमोल मिटकरी यांच्याबाबत ‘सत्यलढा’ या यूट्यूब चॅनलवर तथ्यहीन, दिशाभूल करणारे आणि अपप्रचार करणारे वृत्त प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे. या बातमीमुळे मिटकरी यांची सार्वजनिक आणि राजकीय प्रतिमा डागाळल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी विधानमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला होता.

या प्रकरणात ‘सत्यलढा’ यूट्यूब चॅनलशी संबंधित पत्रकार गणेश सोनावणे, हर्षदा सोनावणे, अमोल नांदुरकर, अंकुश गावडे तसेच संपादक सतीश देशमुख यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर हा विषय विधानमंडळाच्या हक्कभंग व विशेषाधिकार समितीकडे चौकशीसाठी सोपविण्यात आला.

हेही वाचा : पीरियड्स सुरू असताना समुद्रात जाणं पडलं महागात! अचानक 'तो' मासा झाला तिच्याकडे आकर्षित झाला अन्...

हे वाचलं का?

    follow whatsapp