डाव्यांच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलताच नरेंद्र मोदींचे मल्याळम भाषेत 3 ट्वीट; काय म्हणाले?
PM Narendra Modi on Thiruvananthapuram Corporation Election : हा निकाल राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. कारण तिरुवनंतपुरम जिल्हा हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांचा मतदारसंघ आहे. राज्याच्या राजधानीत भाजपने मिळवलेले हे यश पक्षासाठी ऐतिहासिक मानले जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
केरळमध्ये डाव्यांना मोठा धक्का, तिरुवनंतपुरम महापालिकेत कमळ फुललं; 45 वर्षांच्या सत्तेला सुरुंग
डाव्यांच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलताच नरेंद्र मोदींचे मल्याळम भाषेत 3 ट्वीट; काय म्हणाले?
PM Narendra Modi on Thiruvananthapuram Corporation Election : केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मोठं यश मिळवलंय. तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत एनडीए सर्वात मोठा पक्ष ठरला असून, तब्बल 45 वर्षांपासूनच्या डाव्यांच्या सत्तेला त्यांनी सुरुंग लावलाय..
101 प्रभागांच्या तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत एनडीएने 50 जागांवर विजय मिळवला आहे. सत्ताधारी एलडीएफला केवळ 29 जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीला (यूडीएफ) 19 जागा मिळाल्या. दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. एका प्रभागातील उमेदवाराच्या मृत्यूनंतर तेथील मतदान रद्द करण्यात आले होते. या निकालामुळे तिरुवनंतपुरममधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे स्पष्ट झाले असून, महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी एनडीए भक्कम स्थितीत पोहोचली आहे.
हा निकाल राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. कारण तिरुवनंतपुरम जिल्हा हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांचा मतदारसंघ आहे. राज्याच्या राजधानीत भाजपने मिळवलेले हे यश पक्षासाठी ऐतिहासिक मानले जात आहे.
शशि थरुर यांची पहिली प्रतिक्रिया
या निकालांवर प्रतिक्रिया देताना खासदार शशी थरूर यांनी लोकशाहीच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा असल्याचे म्हटले. जनतेने बदलाचा संदेश दिला असून, कोणत्याही पक्षाच्या बाजूने दिलेला कौल स्वीकारणे हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. तिरुवनंतपुरममधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचेही त्यांनी अभिनंदन केले.










