मुंबईची खबर: मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता, ऑनलाइन तिकीट बुक करण्याचे तब्बल 14 पर्याय...

मुंबई तक

अंधेरी पश्चिम-दहिसर-गुंदवल्ली मेट्रो-2A आणि मेट्रो-7 ची तिकीटे काढण्यासाठी 14 पर्याय उपलब्ध असणार आहेत. प्रवाशांना मोबाईलवर 14 अॅप्सच्या माध्यमातून या मेट्रोची तिकीटे काढता येणार आहेत.

ADVERTISEMENT

मेट्रोची तिकीटे बुक करण्याचे तब्बल 14 पर्याय...
मेट्रोची तिकीटे बुक करण्याचे तब्बल 14 पर्याय...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!

point

मेट्रोचे ऑनलाइन तिकीट बुक करण्याचे तब्बल 14 पर्याय...

Mumbai News: मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अंधेरी पश्चिम-दहिसर-गुंदवल्ली मेट्रो-2A आणि मेट्रो-7 ची तिकीटे काढण्यासाठी 14 पर्याय उपलब्ध असणार आहेत. प्रवाशांना मोबाईलवर 14 अॅप्सच्या माध्यमातून या मेट्रोची तिकीटे काढता येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) चे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या उपक्रमामुळे प्रवाशांना मेट्रोची तिकिटे बुक करणं सोपं होणार आहे. 

मेट्रोची तिकिटे आणखी 14 अॅप्सवर... 

एमएमआरडीएने निर्माण केलेली ही संयुक्त मेट्रो प्रणाली महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कंपनी लिमिटेड (M3OCW) द्वारे चालवली जाते. या 37 किलोमीटरच्या संयुक्त मार्गावर दररोज जवळपास 3,50,000 प्रवासी प्रवास करतात. मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतुकीसाठी या प्रवाशांना एकच तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने 'मुंबई वन' अॅप तयार केलं आहे. आता प्रवाशांना मेट्रोची तिकिटे आणखी 14 अॅप्सवर उपलब्ध असणार आहेत. 

हे ही वाचा: Govt Job: LIC मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! तब्बल 19 लाखांचं पॅकेज अन्... कधीपर्यंत कराल अर्ज?

'या' अॅप्सच्या माध्यमातून मिळणार तिकीटे

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रिंसिपल सेक्रेटरी अश्विनी भिडे, MMRDA चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, M3OCW च्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल उपस्थित होत्या. आता ऑनलाइन तिकीट खरेदी करण्याची सुविधा केवळ मेट्रो वन अॅप आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मिळते. आता ही सुविधा अपग्रेड केल्यानंतर तब्बल 14 अॅप्सद्वारे प्रवाशांना तिकीटे मिळवता येतील. ही सर्व्हिस सुरू झाल्यानंतर, प्रवासी  Easy My Trip, RedBus, Tummoc, Yatri, Highway Delight, Ixigo, Miles, Kilometers, Telegram, Navi, One Ticket, Redrail, Tripozo आणि Vodafone Idea या अॅप्सच्या माध्यमातून तिकीटे खरेदी करू शकतात. 

हे ही वाचा: "बायकोने माझे अश्लील फोटो व्हायरल केले..." पतीने आपल्याच पत्नीविरुद्ध दाखल केली तक्रार! नेमकं प्रकरण काय?

यासोबतच, Paytm, Uber आणि Rapido लवकरच ही सर्व्हिस सुरू करणार असल्याची शक्यता आहे. त्यानंतर, ही सर्व्हिस Metro 2B, 4 आणि 4A यांसारख्या मेट्रोच्या दुसऱ्या मार्गिकेसाठी सुद्धा सुरू केली जाईल. मंगळवारी मेट्रो 2 ब्लू लाइन मार्गिकेसाठी ऑनलाइन तिकीट Uber च्या माध्यमातून मिळणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. मेट्रो 1 साठी पेपरलेस तिकीटे अधिकृत वेबसाइट आणि Vodafone Idea, WhatsApp, MumbaiOne, Vantikit, Yatri, Navi, Ixigo, Tripozo, redBus, Paytm तसेच PhonePe या प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असतील. 

हे वाचलं का?

    follow whatsapp