पतीला सोडून प्रियकरासोबत गेली पळून! पण, काही दिवसांतच नको ते घडलं अन्...

आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत फरार होणं पीडित महिलेला महागात पडल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं काय घडलं?

काही दिवसांतच नको ते घडलं अन्...

काही दिवसांतच नको ते घडलं अन्...

मुंबई तक

• 11:25 AM • 17 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पतीला सोडून प्रियकरासोबत गेली पळून!

point

पण, काही दिवसांतच नको ते घडलं अन्...

point

विवाहबाह्य संबंधातून धक्कादायक घटना

Crime News: एक महिला आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याचं वृत्त समोर आलं आहे. मात्र, आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत फरार होणं संबंधित महिलेला महागात पडल्याचं सांगितलं जात आहे. महिला तिच्या घरातून 2 लाख रुपये रोख आणि तिचे सर्व दागिने सोबत घेऊन पळून गेली. तिचा प्रियकर तिच्यासोबत तीन वेगवेगळ्या ठिकाणी घर भाड्याने घेऊन राहिला. नंतर, जेव्हा पीडितेचे सर्व पैसे संपले तेव्हा तिच्या प्रियकराने तिच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. त्यानंतर, महिलेने आणखी पैसे कुठून आणू? असा जाब विचारला असता त्याने तिला बेदम मारहाण केली आणि प्रेयसीला बळजबरीने ट्रेनमधून बसवून नंतर पळून गेला. 

हे वाचलं का?

पीडिता पुन्हा तिच्या पतीकडे गेली आणि तिने त्याला रडत रडत तिच्यासोबत प्रियकराने केलेल्या कृत्याबाबत सांगितलं. त्यावेळी, पतीने आपल्या पत्नीला सपोर्ट करण्याचं ठरवलं. त्यानंतर, दोघे पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. 

पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली... 

संबंधित प्रकरण मध्य प्रदेशातील इंदूर येथील चंदननगर पोलीस ठाणे परिसरातील असल्याची माहिती आहे. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, "एका तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. पती कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर तिचा प्रियकर तिला भेटण्यासाठी येत होता. कालांतराने दोघांमध्ये संबंध निर्माण झाले आणि महिलेच्या प्रियकराने तो तिच्यासोबत लग्न करणार असल्याचं तिला सांगितलं. पीडिता पुढे म्हणाली की, मी माझ्या प्रियकराच्या बोलण्यात आले आणि त्यावेळी मी माझ्या पतीचा सुद्धा विचार केला नाही. प्रियकराच्या सांगण्यावरून, घरातून 2 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन मी पळून गेले. परंतु, काही दिवसांतच प्रियकराने माझे सगळे पैसे खर्च केले आणि मला मारहाण करण्यास सुरूवात केली." पीडितेच्या माहितीनुसार, आरोपीने महिलेला सिगारेटचे चटके सुद्धा दिले.

हे ही वाचा: देवेंद्र फडणवीसांच्या सभेआधी भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, अंबरनाथमध्ये भीतीचं वातावरण

दागिने विकून आणखी पैशांची मागणी 

महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिला पिथमपूर, इंदूर आणि सिहोर या वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या घरात ठेवलं. या काळात त्याने तिचं बऱ्याचदा शारीरिक शोषण केलं आणि तिचे पैसे, दागिने खाण्यापिण्यासाठी तसेच खोलीच्या भाड्यावर खर्च केले. पीडिता म्हणाली की तिच्याकडील सर्व पैसे संपल्यानंतर त्याने तिचे दागिने विकले. मात्र, त्यानंतर सुद्धा तो तिच्याकडे आणखी पैशांची मागणी करू लागला. यावर पीडितेने आणखी पैसे कुठून आणू? असं विचारलं असता आरोपीने तिला मारहाण केली. 

हे ही वाचा: सोलापूर : थंड पेयात औषध मिसळून 13 वर्षीय मुलीवर 50 वर्षीय नराधमाकडून बलात्कार, मुलगी अत्याचारातून आई झाली

त्यानंतर एके दिवशी, तो तिला बळजबरीने इंदूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसवून पळून गेला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती तिच्या पतीकडे परत आली, घडलेली घटना सांगितली आणि नंतर पोलिसांची मदत घेतली. सध्या, पोलिस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती आहे. 

    follow whatsapp