Crime News: बिहारमधील जहानाबाद येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका ऑटो ड्रायव्हरने अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत घृणास्पद कृत्य केल्याचं वृत्त आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचताच, आरोपी ऑटो चालकाला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली.
ADVERTISEMENT
शाळकरी मुलीवर बलात्कार...
संबंधित घटना मखदुमपूर पोलीस स्टेशन परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एका ऑटो ड्रायव्हरने शाळेत परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला. पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आरोपी ऑटो चालकाला अटक करून त्याला तुरुंगात पाठवलं आहे.
हे ही वाचा: मोलकरणीवर मालकाचा लैंगिक अत्याचार! शेवटी, पत्नीसोबत मिळून निर्घृण हत्या, सूटकेसमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह...
निर्जन ठिकाणी रिक्षा थांबवली अन् घृणास्पद कृत्य
अल्पवयीन विद्यार्थिनी जहानाबादमधील तिच्या शाळेत परीक्षा देऊन ट्रेनमधून घरी परतत होती. दरम्यान, ती मखदुमपूर स्टेशनवर ट्रेनमधून उतरली. संध्याकाळ झाल्यामुळे घरी जाण्यासाठी स्टेशनवरून ऑटोरिक्षा बुक केली. पण, वाटेत ड्रायव्हर चुकीच्या दिशेने रिक्षा चालवत होता आणि त्यानंतर त्याने एका निर्जन ठिकाणी ऑटोरिक्षा थांबवली. त्या ठिकाणी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. विद्यार्थिनीने त्यावेळी खूप आरडाओरडा केला, पण तो निर्जन परिसर असल्याने कोणीही तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकला नाही. त्यानंतर पीडितेसोबत घृणास्पद कृत्य करून आरोपी ऑटो ड्रायव्हर तिथून फरार झाला.
हे ही वाचा: "तुझं लग्न होऊ देणार नाही.." दाजीने मेहुणीला पाठवले अश्लील मॅसेज अन् विरोध केल्यास 'ती' धमकी!
त्यानंतर, पीडित मुलगी कशीबशी तिच्या घरी पोहोचली आणि तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर ती तिच्या कुटुंबियांसह पोलीस स्टेशनमध्ये गेली. तिथे पीडित तरुणी पोलिसांना ऑटो चालकाच्या कृत्याबद्दल रडत रडत सांगत होती. पीडितेने घटनेची माहिती देताना सांगितलं की ती संध्याकाळी उशिरा ट्रेनने मखदुमपूर स्टेशनवर आली होती. तिला लवकर घरी पोहोचायचं होतं, त्यामुळे तिने जवळच एक ऑटोरिक्षा बुक केली. रस्त्यात एक निर्जन परिसर पाहून आरोपी ड्रायव्हरने अचानक ऑटोरिक्षा थांबवली. त्यानंतर त्याने अल्पवयीन पीडितेला रस्त्याच्या कडेला नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
ADVERTISEMENT











