पती बाहेर गेल्यानंतर आरोपी घरात शिरायचा अन् पीडितेसोबत अश्लील कृत्ये! मुलांसमोर सुद्धा...

एका व्यक्तीने पीडित महिलेसोबत अश्लील कृत्ये केल्याचा आणि तिला धमकी दिल्याचे आरोप आहेत. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी तिला वेगवेगळ्या मार्गाने सतत त्रास द्यायचा.

पती बाहेर गेल्यानंतर आरोपी घरात शिरायचा अन्...

पती बाहेर गेल्यानंतर आरोपी घरात शिरायचा अन्...

मुंबई तक

• 05:04 PM • 19 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पती बाहेर गेल्यानंतर आरोपी घरात शिरायचा अन्...

point

पीडितेसोबत आरोपीची अश्लील कृत्ये

Crime News: उत्तर प्रदेशातील आग्रा येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने पीडित महिलेसोबत अश्लील कृत्ये केल्याचा आणि तिला धमकी दिल्याचे आरोप आहेत. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी तिला वेगवेगळ्या मार्गाने सतत त्रास द्यायचा. तो पीडितेच्या मोबाईलवर घाणेरडे मॅसेज पाठवायचा आणि कॉलवर बोलण्याने तो तिला मानसिक त्रास द्यायचा. 

हे वाचलं का?

पीडितेकडून 1.32 लाख रुपये उकळले... 

प्रकरणातील आरोपीचं नाव शम्सुद्दीन असून तो पीडित महिलेला सतत ब्लॅकमेल करायचा. पीडिता आरोपीला घाबरून मेहनतीने कमवलेले पैसे त्याला देत होती. अशा पद्धतीने महिलेने आरोपी शम्सुद्दीनला जवळपास 1.32 लाख रुपये दिले होते. पीडिता म्हणाली की, तिचा पती कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर शम्सुद्दीन तिच्या घरात घुसायचा. त्यावेळी, तो पीडितेसोबत अश्लील कृत्ये आणि तिचा विनयभंग करायचा. इतकेच नव्हे तर, तो तिला जीवे मारण्याची सुद्धा धमकी द्यायचा. 

हे ही वाचा: "चल, तुला शाळेत सोडतो..." मुलाच्या वर्गातील मैत्रिणीला गाडीत बसवलं अन् निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार!

निर्दयीपणे हल्ला अन् घृणास्पद कृत्य 

14 नोव्हेंबरच्या रात्री तर आरोपीने मर्यादाच ओलांडली. शम्सुद्दीन पुन्हा पीडितेच्या घरात घुसला आणि त्यावेळी त्याने 2 लाख रुपयांच्या मोठ्या रकमेची मागणी केली. आरोपीला पैसे देण्यासाठी पीडितेने नकार दिल्यावर त्याने क्रूरतेचा कळस गाठला. शम्सुद्दीनने महिलेवर निर्दयीपणे हल्ला केला आणि तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं. त्यावेळी, पीडित महिलेच्या मुलांनी सुद्धा आईला वाचवण्याच्या प्रयत्नात आरोपीला विरोध केला पण, क्रूर शम्सुद्दीनने पीडितेच्या मुलांवर सुद्धा हल्ला केला. 

हे ही वाचा: अमेरिका अन् आपल्या वेळेत अंतर, उद्यापर्यंत एपस्टीन फाईलमधील भारतीयांचे नावे येतील, पृथ्वीराज चव्हाणांचे सनसनाटी दावे

या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे, संबंधित कलमांखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

    follow whatsapp