पाच राज्यातील पराभव जिव्हारी.. गांधी परिवाराने दाखवली राजीनामा देण्याची तयारी

मुंबई तक

• 05:38 PM • 13 Mar 2022

नवी दिल्ली: ‘काही लोकांना असं वाटतं की, गांधी कुटुंबामुळे काँग्रेस पक्ष कमकुवत होत आहे. जर तुम्हा सर्वांना असं वाटत असेल तर आम्ही कोणत्याही प्रकारचा त्याग (पद सोडण्यासंबंधी) करण्यासाठी तयार आहोत.’ असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (13 मार्च) नवी दिल्लीत पार पडलेल्या CWC बैठकीत केलं असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. अशा स्वरुपाचं वक्तव्य त्यांनी […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: ‘काही लोकांना असं वाटतं की, गांधी कुटुंबामुळे काँग्रेस पक्ष कमकुवत होत आहे. जर तुम्हा सर्वांना असं वाटत असेल तर आम्ही कोणत्याही प्रकारचा त्याग (पद सोडण्यासंबंधी) करण्यासाठी तयार आहोत.’ असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (13 मार्च) नवी दिल्लीत पार पडलेल्या CWC बैठकीत केलं असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. अशा स्वरुपाचं वक्तव्य त्यांनी पहिल्यांदाच केलं आहे. त्यामुळे नुकताच झालेला पाच राज्यातील पराभव त्यांच्याही जिव्हारी लागला असल्याचं बोललं जात आहे.

हे वाचलं का?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवर काँग्रेस कार्यकारिणीची (CWC)रविवारी दिल्लीत बैठक झाली. ज्याचे अध्यक्षपद पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भूषवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी पक्षाच्या महत्त्वांच्या पदाचा राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली. पण असं असलं तरीही यापुढे देखील सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालीच पक्ष पुढे जाईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीची माहिती देताना काँग्रेस नेते राजीव शुक्ला म्हणाले की, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला पुढे नेण्याबाबत सर्वांचे एकमत झाले आहे. याशिवाय काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर आपला सर्वांचा विश्वास असल्याचे सांगितले.

मात्र, बैठकीनंतर रणदीप सुरजेवाला म्हणाले की, पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की, राहुल गांधींनी त्यांचे नेतृत्व करावे. मात्र 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पक्षाच्या पुढील निवडणुकीत काँग्रेसच्या अध्यक्षाची निवड होणार आहे.

CWCच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘काही लोकांना वाटते की गांधी घराण्यामुळे पक्ष कमकुवत होत आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल तर आम्ही कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यास तयार आहोत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची ऑफरही दिली.’

काँग्रेसला मजबूत करणे हे आमचे पहिले उद्दिष्ट असल्याचेही यावेळी म्हणाल्या. याचवेळी असंही ठरलं की, काँग्रेस एप्रिलमध्ये चिंतन शिबिर आयोजित करणार आहे. दुसरीकडे पंजाबच्या पराभवाची जबाबदारी घेत हरीश चौधरी म्हणाले की, पंजाबच्या निकालाची जबाबदारी मी घेतो. आम्ही पुन्हा नव्या रणनीतीने लढू. आम आदमी पार्टी ही भाजपची बी टीम असल्याचे ते यावेळी म्हणाले.

‘काँग्रेसची अवस्था नादुरूस्त हवेलीच्या जमीनदारासारखी’ शरद पवारांचं भाष्य खरं ठरतंय?

राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष करण्याच्या मागणीने धरला जोर

काँग्रेसमध्ये वेगाने बदलाची मागणी होत आहे. या संदर्भात काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनीही राहुल गांधींनी पूर्णवेळ भूमिकेत काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी, असे म्हटले आहे.’माझ्यासारख्या कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्त्यांची हीच इच्छा असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी दोन वर्षांपूर्वी G-23 सदस्यांनी लिहिलेले पत्र शेअर केले होते आणि ते म्हणाले की, पत्रात सर्व सदस्यांनी संघटना बदलण्याची मागणी केली होती. जेणेकरून परिस्थिती अधिक चांगली होईल, परंतु तेव्हापासून फारसा बदल झालेला नाही.

    follow whatsapp