Gold price: सोनं खरेदी करण्यासाठी अजूनही सुवर्णसंधी, एक तोळ्याचा आजचा भाव किती?

रोहिणी ठोंबरे

29 Apr 2024 (अपडेटेड: 29 Apr 2024, 01:12 PM)

Gold Silver Rate : सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? मग तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. सोन्याच्या भावात आता घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर गगनाला भिडलेले असताना अनेकांचं टेन्शन वाढलं तर काहींना घामच फुटला. अशात त्यांना ही बातमी वाचून थोडा दिलासा मिळेल.

Mumbaitak
follow google news

Gold-Silver Rate : सोनं खरेदी (Gold Rate) करण्याचा विचार करताय? मग तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. सोन्याच्या भावात आता घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर गगनाला भिडलेले असताना अनेकांचं टेन्शन वाढलं तर काहींना घामच फुटला. अशात त्यांना ही बातमी वाचून थोडा दिलासा मिळेल. बुलियन मार्केट (Bullions Markert) या वेबसाइटवरील नवीन अपडेटनुसार, सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. (Gold Silver price today is a golden opportunity to buy gold what is the price of 24 carat 10 gram gold)

हे वाचलं का?

कितीने घसरले सोन्या-चांदीचे भाव?

आज 29 एप्रिल 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 71, 550 रूपये आहे. तर काल (28 एप्रिल) ही किंमत 72, 950 रूपये प्रति 10 ग्रॅम होती. त्याचबरोबर जर आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत पाहायची झाली तर ती 65, 468 रूपये आहे.  

हेही वाचा : BJP Lok Sabha Election : भाजपने महाराष्ट्रातील 'या' 7 खासदारांची कापली तिकिटं

तसंच, चांदीची किंमत आज 82, 500 रूपये प्रति किलोने आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 81, 160 रूपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती देशभरात बदलतात. एका बाजूला देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीचे दर वाढत आहेत, तसंच दुसऱ्या बाजूलाही म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. या दरम्यान, अक्षय तृतीयेचा सण जवळ आला आहे. यामुळे सोन्याच्या दरात झालेली घसरण सर्वसामान्यांच्या फायद्याची ठरत आहे.

    follow whatsapp