Shocking Love Story Viral News : एकतर्फ्री प्रेमाचा शेवट खूप भयानक असतो, असं म्हणतात. असंच काहीसं उत्तर प्रदेशच्या गाजीपूरच्या भुडकुडा कोतवाली मुडीयारी गावात घडलं आहे. जेव्हा एक दाम्पत्य रात्री झोपलं होतं. त्याचदरम्यान एका तरुणाने अचानक तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा कसून तपास केला, तेव्हा उघडकीस आलं की, आरोपी तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. तो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्या महिलेशी बोलायचा.
ADVERTISEMENT
पण जेव्हा तो त्याच्या प्रेमात अपयशी झाला. तेव्हा त्याने एक भयंकर कांड केला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी तरुणाला अटक केली आहे. आरोपी तरुणाचं नाव संगम राजभर आहे. ही धक्कादायक घटना 23 जूनच्या रात्री घडली. 23 जूनला विनय आणि त्याची पत्नी रुममध्ये झोपले होते.
हे ही वाचा >> मोठी बातमी! जयंत पाटील यांचा शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, 'हा' नेता पदभार सांभाळणार
पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु
गावाजवळच राहणारा संगम राजभर त्यांच्यात घरात लपला होता. त्याने दाम्पत्य झोपत असताना त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला आणि पळून गेला. या हल्ल्यात विनय आणि त्याची पत्नी जखमी झाली. यानंतर त्यांनी भुडकुडा कोतवालीमध्ये गुन्हा दाखल केला. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.
आरोपी तरुण संगम राजभर ब्रम्हबाबा मंदिर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आरोपीला जेलमध्ये पाठवण्यात आलं. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तरुण संगम विनयच्या पत्नीशी एकतर्फी प्रेम करायचा. तो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्याशी बोलायचा. पण जेव्हा त्याला वाटलं की, तो प्रेमात अयशस्वी होत आहे.
हे ही वाचा >> बीड जिल्ह्यात चाललंय तरी काय? माजी सरपंचाकडून धारदार कोयत्याने तरुणाच्या डोक्यात सपासप वार, कारण ऐकून बसेल धक्का
तेव्हा त्याने अशाप्रकारचं पाऊल उचललं. रात्री झोपेत असताना संगमने विनय आणि त्याच्या पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीने कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार केले आणि फरार झला. भुडकुडा पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली आणि घटनास्थळावरून कुऱ्हाड जप्त केली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला कोर्टात हजर करून जेलमध्ये पाठवलं.
ADVERTISEMENT
