पिझ्झा अन् कोल्ड्रिंक्समध्ये टाकलं गुंगीचं औषध! IIM बॉईज हॉस्टेलमध्ये तरुणीवर बलात्कार.. नेमकं काय घडलं?

Rape Case Crime News : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या दक्षिण भागातील जोकामध्ये संतापजनक घटना घडली. येथील आयआयएमच्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थीनीसोबत बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली.

 देवबंदमधील एका खाजगी शाळेत महिला शिक्षिकेवर बलात्काराचा खटला

Kolkata Rape Case

मुंबई तक

• 09:23 PM • 13 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

आयआयएम कॅम्पसमध्ये बलात्काराची धक्कादायक घटना

point

नराधमाने बॉईज हॉस्टेलमध्ये विद्यार्थीनीवर केला बलात्कार

point

त्या कॉलेजमध्ये काय घडलं?

Rape Case Crime News : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या दक्षिण भागातील जोकामध्ये संतापजनक घटना घडली. येथील आयआयएमच्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थीनीसोबत बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या तरुणीसोबत बलात्कार झाला, ती या कॉलेजची विद्यार्थीनी नाहीय. पीडिते विद्यार्थीनीने हरिदेवपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

हे वाचलं का?

पीडितेनं तिच्या तक्रारीत म्हटलं की, जेव्हा ती आयआयएम कॅम्पसमध्ये दाखल झाली, तेव्हा तिची एन्ट्री आणि रजिस्ट्रेशन केलं गेलं नाही. ती तिच्या मैत्रिणीसोबत हॉस्टेलमध्ये थांबली होती.पीडितेनं सांगितलं की, तिला इंटर्नशिप आणि काऊन्सलिंगसाठी बॉईज हॉस्टेलमध्ये बोलावलं होतं.

जेव्हा ती बॉईज हॉस्टेलमध्ये पोहोचली आणि आरोपी विद्यार्थ्याच्या रुममध्ये गेली, तेव्हा तिला पिझ्झा आणि कोल्ड्रिंक्स देण्यात आली. आरोपीने तिला पिझ्झा आणि कोंल्ड्रिंक पिण्यासाठी सांगितलं आणि तो रुममधून बाहेर पडला. तिने पिझ्झा खाल्ला आणि काही वेळानंतर ती बेशुद्ध झाली. जेव्हा ती शुद्धीवर आली, तेव्हा तिला कळलं की, तिच्यासोबत बलात्कार करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> मुंबईची खबर: मुंबईत मिळणार स्वस्तात घर! 'MHADA' मध्ये निघाली मोठी लॉटरी, बघा तुमचा नंबर लागतोय का..

घटनेबाबत पोलिसांनी काय म्हटलंय?

या घटनेबाबत माहिती देताना, संयुक्त सीपी (गुन्हे) कोलकाता पोलिसांनी सांगितलं की, काल उशिरा रात्री एका तरुणीने हरिदेवपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आयआयएम परिसरात एका विद्यार्थ्याने तिच्यासोबत बलात्कार केला, असं तिने तक्रारीत म्हटलंय. पीडितेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या. काही दिवसांपूर्वी कस्बा लॉ कॉलेजमध्ये बलात्काराची घटना घडल्याचं बोललं जातंय. कॉलेज परिसरात एका तरुणीसोबत बलात्कार करण्यात आला. या कॉलेजचा माजी विद्यार्थीच या घटनेचा आरोपी आहे. 

हे ही वाचा >> पुणे हादरलं! पान पट्टीवर तरुण खात होता पान, शुल्लक कारणावरून झाला वाद, कोयत्याने सपासप वार अन्...

त्या ठिकाणीही घडली होती बलात्काराची घटना

कल्याण परिसरात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली होती. येथे कसारा आणि अकोला दरम्यान निघालेल्या मेल एक्स्प्रेसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. नराधम पीडित तरुणीला त्याच्यासोबत गावात घेऊन गेला होता. त्यानंतर त्याच्या आईने म्हटलं होतं की, मुलीला परत सोडून ये. तेव्हा आरोपीने तरुणीला अकोला स्टेशनवर सोडलं आणि तिथून पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं. आरोपीला 15 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.

    follow whatsapp