Maharashtra Weather : हवामान विभागाने राज्यातील हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नुसार हवामान अंदाजात मान्सूनमध्ये वेळोवेळी बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात जुलै महिन्यात मान्सूनचा जोर हा कायम असणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस हजेरी लावेल. उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिकच राहील, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मोठी बातमी! जयंत पाटील यांचा शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, 'हा' नेता पदभार सांभाळणार
कोकण :
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच हवामान विभागाने 100-150 मिमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगडला येलो किंवा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील भागात म्हणजेच पुणे जिल्ह्यातील लोणावळा घाटमाथ्यावर, तसेच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या घाटमाथ्यावरील भागात पावसाची शक्यता आहे. पुणे आणि साताऱ्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे.
मराठवाडा :
मराठवाड्यातील छ.संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची स्थिती आहे. काही ठिकाणी गडगडाटी वादळासह पाऊस हजेरी लावेल. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारेल. अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
विदर्भ :
विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि गोंदियात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीत हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हेही वाचा : बीड जिल्ह्यात चाललंय तरी काय? माजी सरपंचाकडून धारदार कोयत्याने तरुणाच्या डोक्यात सपासप वार, कारण ऐकून बसेल धक्का
उत्तर महाराष्ट्र :
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, आहिल्यानगर, नंदुरबारमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर हवामान खात्याने शेतकऱ्यांसाठी भारतीय हवमान विभाग आणि कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार, पेरणी आणि पिकांच्या व्यवस्थापनासाठी स्थानिक हवामन केंद्रांशी संपर्क साधा, पिकांचं संरक्षण करा असा सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT
