Chhangur Baba Case New Update: छांगुर बाबाच्या धर्मांतरच्या रॅकेटने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरून गेला होता. छांगुर बाबा हा नवीन वोहरा और नीतू वोहरासोबत मिळून हे रॅकेट चालवत होता. सध्या, छांगुर बाबा उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणाबद्दल आता नवीन माहिती समोर आली आहे. अटक होण्याच्या पूर्वी जमालुद्दीन उर्फ छांगुर बाबा लखनऊच्या एका हॉटेलमध्ये नीतू वोहरासोबत लपून बसला होता. विकास नगरमधील या हॉटेलच्या मॅनेजरने काही धक्कादायक खुलासे केल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
वडील आणि मुलगी म्हणून राहिले...
हॉटेल मॅनेजरने दिलेल्या माहितीप्रमाणे, छांगुर बाबा आणि नसरीन दोघे वडील आणि मुलगी असल्याचे भासवून त्या हॉटेलमध्ये राहिले. ते दोघेही 16 एप्रिल 2025 रोजी हॉटेलमध्ये आले आणि तेव्हापासून त्यांना अटक होईपर्यंत म्हणजेच 5 जुलै 2025 पर्यंत तिथे लपून राहिले होते.
हे ही वाचा: न्यूड केलं अन् 'ओरल सेक्स' करायला लावलं, Video केला शूट; मुंबईतील धक्कादायक घटना
बुकिंग वाढवण्यात आलं
ते दोघांनी हॉटेलमधील 102 नंबरची एक खोली बुक केली होती. सुरुवातीचं बुकिंग चार दिवसांसाठी होतं आणि ते नंतर एका आठवड्यासाठी वाढवण्यात आले. नंतर त्यांनी बऱ्याचदा बुकिंग 10 दिवसांसाठी वाढवले. या काळात नसरीन क्वचितच बाहेर जायची. ती फक्त जेवण आणण्यासाठी बाहेर येत होती. दोघेही कोणालाही भेटत नव्हते आणि त्यांची ओळख गुप्त ठेवली.
हे ही वाचा: घरमालकासोबत सुरू होते महिलेचे शरीर संबंध, पतीने रंगेहाथ पकडलं; पत्नी म्हणाली, 'जे सुरू आहे ते गुपचूप पाहा नाहीतर...'
खोली बदलली आणि नंतर ATS ने पकडले
मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, 3 जुलै 2025 रोजी छांगुर बाबा आणि नीतू रोहरा यांनी त्यांची खोली बदलली आणि ते रूम नंबर 104 मध्ये शिफ्ट झाले. मात्र, त्यांच्या लपून राहण्याचा खेळ हा तिथेच संपला. त्यानंतर फक्त दोन दिवसांनी म्हणजे 5 जुलै रोजी उत्तर प्रदेश एटीएस (ATS) ने दोघांनाही अटक केली. त्यांना अटक झाल्यानंतर ते दोघे मोठे गुन्हेगार असल्याचं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना कळालं.
ADVERTISEMENT
