Brain dead woman News : उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेल्या विनीता शुक्ला यांना प्रकृती खालावल्यामुळे बरेली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना 'ब्रेन डेड' घोषित केले आणि व्हेंटिलेटर काढून त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला. या निधनाच्या बातमीने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. विनीता यांचे पार्थिव घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि तिकडे पीलीभीतमध्ये नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारीही पूर्ण केली होती. मुले आणि पती कुलदीप शुक्ला हे विनीता यांच्या शेवटच्या दर्शनासाठी अश्रू ढाळत असतानाच नियतीचा खेळ वेगळाच होता.
ADVERTISEMENT
हेही वाचा : तीन मुली झाल्या, दुसरं लग्न करण्याची परवानगी दे, सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या
एका धक्क्याने परतले प्राण
रुग्णवाहिकेने विनीता यांना घरी नेले जात असताना हाफिजगंज जवळ रस्त्यावर एका मोठ्या खड्ड्यात रुग्णवाहिकेचे चाक गेले. या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला इतका जोरात झटका बसला की, मृत समजल्या जाणाऱ्या विनीता यांच्या शरीरात अचानक हालचाल सुरू झाली. हे पाहून पती आणि नातेवाईकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी विलंब न करता रुग्णवाहिका पुन्हा पीलीभीत येथील एका खासगी रुग्णालयाकडे वळवली. ज्या ठिकाणी अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती, तिथे अचानक ही 'चमत्कारा'ची बातमी पोहोचली आणि शोकसागरात बुडालेल्या कुटुंबाला आशेचा किरण दिसला.
हेही वाचा : 16 मार्चपासून महालक्ष्मी राजयोग! 'या' 3 राशींवर होणार धनवर्षाव, जुने वादही मिटणार; तुमची रास यात आहे का?
डॉक्टरांचे कौशल्य आणि उपचार
पीलीभीत येथील न्यूरोसर्जन डॉ. राकेश सिंह यांनी विनीता यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. तपासणी दरम्यान त्यांना विनीता यांच्या शरीरात 'स्नेक बाइट' म्हणजेच सर्पदंशाची लक्षणे दिसून आली. याच संशयावरून त्यांनी तातडीने 'अँटी-व्हेनम' इंजेक्शन आणि आवश्यक औषधे देण्यास सुरुवात केली. लखनऊ येथील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सुरू केलेल्या या उपचारांना 24 तासांत यश आले आणि विनीता यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. तब्बल 13 दिवसांच्या सखोल उपचारानंतर विनीता आता पूर्णपणे ठणठणीत असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय विनीता यांच्या बाबतीत तंतोतंत आला आहे. डॉक्टरांच्या मते, काही वेळा सर्पदंशामुळे किंवा न्यूरोलॉजिकल स्थितीमुळे रुग्ण कोमात जातो आणि तो ब्रेन डेड असल्यासारखा भासतो. विनीता यांच्या प्रकरणात रस्त्यातील तो खड्डा चक्क जीवनदान देणारा ठरला, कारण त्या धक्क्यामुळे त्यांच्या शरीरातील चेतना पुन्हा जागृत झाली. आज विनीता यांच्या घरी आणि त्यांच्या कार्यालयात आनंदाचे वातावरण असून, हा केवळ वैद्यकीय चमत्कार नसून नियतीचा खेळ असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Hardik Pandya आणि Mahika Sharma विरोधात पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT











