सातारा : दहावीचा मराठीचा पेपर सहावीच्या विद्यार्थिनींकडून तपासून घेतला, फलटणमधील शाळेतील धक्कादायक प्रकार, व्हिडिओ व्हायरल

Satara News : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून शिक्षण व्यवस्थेला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये दहावीच्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका चक्क सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींकडून तपासून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकारामुळे पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Satara News

Satara News

मुंबई तक

12 Mar 2026 (अपडेटेड: 12 Mar 2026, 12:19 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

दहावीचा मराठीचा पेपर सहावीच्या विद्यार्थिनींकडून तपासून घेतला

point

फलटणमधील शाळेतील धक्कादायक प्रकार

point

पहा व्हिडिओ

Satara News, इम्तियाज मुजावर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जातात. मात्र, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून शिक्षण व्यवस्थेला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये दहावीच्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका चक्क सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींकडून तपासून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकारामुळे पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : डॉक्टरांनी महिलेला 'ब्रेन डेड' घोषित केलं, व्हेंटिलेटर काढलं; अंत्यसंस्काराची तयारी अन् रुग्णवाहिकेतून नेताना जागी झाली

सहावीच्या विद्यार्थिनींकडून उत्तरपत्रिकांची तपासणी

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या शाळेतील एका शिक्षकाने उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करताना नियम पायदळी तुडवले. सदर शिक्षकाने दहावीचे पेपर स्वतः तपासण्याऐवजी सहावीच्या दोन विद्यार्थिनींना आपल्याजवळ बसवून घेतले आणि त्यांच्याकडून हे पेपर तपासून घेतल्याचे सांगितले जात आहे. या धक्कादायक प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आल्याची चर्चा असून, त्यामध्ये संबंधित शिक्षक विद्यार्थिनींच्या मदतीने उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासताना दिसत असल्याचे बोलले जात आहे.

शिक्षणव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

दहावीच्या परीक्षेवर विद्यार्थ्यांचे पुढचे भविष्य अवलंबून असते. अशा अत्यंत संवेदनशील कामात शिक्षकाने दाखवलेला हा निष्काळजीपणा पूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरला आहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन हे केवळ पात्र आणि नियुक्त शिक्षकांनीच करणे बंधनकारक असताना शाळकरी मुलांकडून उत्तर पत्रिका तपासून  घेणे हा प्रकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ मांडणारा आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : तीन मुली झाल्या, दुसरं लग्न करण्याची परवानगी दे, सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी

या गंभीर प्रकरणावर अद्याप शाळा प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या अशा बेजबाबदार शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता पालकांमधून जोर धरू लागली आहे. आता सातारा जिल्हा शिक्षण विभाग या प्रकरणी नेमकी काय दखल घेतो आणि दोषींवर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

    follow whatsapp