मुंबई : मानखुर्दमध्ये फालुदा विक्रेत्याची चाकूने सपासप वार करुन हत्या, हादरवून टाकणारं सीसीटीव्ही फुटेज समोर

Mankhurd Crime News : मुंबईतील मानखुर्द परिसर एका भीषण हत्याकांडाने हादरून गेला आहे. एका फालुदा विक्रेत्याची भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही सर्व घटना जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यातील अंगावर शहारे आणणारे फुटेज समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला आहे.

Mankhurd Crime News

Mankhurd Crime News

मुंबई तक

11 Mar 2026 (अपडेटेड: 11 Mar 2026, 04:01 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मानखुर्दमध्ये फालुदा विक्रेत्याची चाकूने सपासप वार करुन हत्या

point

हादरवून टाकणारं सीसीटीव्ही फुटेज समोर

Mankhurd Crime News : मुंबईतील मानखुर्द परिसर एका भीषण हत्याकांडाने हादरून गेला आहे. एका फालुदा विक्रेत्याची भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही सर्व घटना जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यातील अंगावर शहारे आणणारे फुटेज समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Stuti Sonawane Suicide Case : ताज हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेशन, आनंदी ठेवलं, पण अचानक फैजुलचा स्वभाव बदलला

चाकूने सपासप वार

मृत व्यक्तीची ओळख वाहिद शेख अशी झाली आहे. वाहिद हा मानखुर्द भागात फालुदाची गाडी चालवून आपला उदरनिर्वाह करत असे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, वाहिद आपली फालुदाची गाडी घेऊन नेहमीप्रमाणे रस्त्यावरून जात होता. त्याच वेळी मागून एक व्यक्ती धावत आली आणि वाहिदला काही समजण्यापूर्वीच त्याने चाकूने त्याच्यावर एकापाठोपाठ एक सपासप वार करण्यास सुरुवात केली.

किरकोळ कारणावरुन वाद

हल्ला इतका भीषण होता की वाहिद रक्ताच्या थारोळ्यात तिथेच रस्त्यावर कोसळला. कृत्य केल्यानंतर आरोपी सहजपणे घटनास्थळावरून पसार झाला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी वाहिद आणि हल्लेखोरामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती. त्याच वादाचा बदला घेण्यासाठी हल्लेखोराने दिवसाढवळ्या हे रक्ताळलेले हत्याकांड घडवून आणले.

हे ही वाचा : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 18 वर्षानंतर लग्नासाठी आणला दबाव अखेर...

पोलिसांचा दावा काय?

घटनेनंतर स्थानिक लोकांनी गंभीर जखमी वाहिदला तातडीने जवळच्या शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र, जखमा खोल असल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.

    follow whatsapp