Hingoli sucide : हिंगोलीमधील सलवा गावात एका शेतकऱ्याने कर्जाच्या त्रासाला कंटाळून जाळून घेत स्वत:चं जीवन संपवलं. मृत शेतकऱ्याचे नाव दत्तराव दिगंबर माखने (वय 48) असे आहे. राज्य सरकारने 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा देखील केली आहे. या घटनेनं प्रशासनावर प्रत्येक स्तरातून प्रश्न उपस्थित होत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 18 वर्षानंतर लग्नासाठी आणला दबाव अखेर...
कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
संबंधित प्रकरणात, शेतकरी दत्तराव दिगंबर माखणे आणि पत्नीवर एकत्रित 3 लाखांचे कर्ज होते, ज्यात बँकेचे 2 लाख रुपये, खत आणि बियाण्यांसाठी दुकानदारांकडून 2 लाख रुपये आणि सावकारांकडून 3 लाख रुपयांचा समावेश आहे. गेल्या काही माहिन्यांपासून सतत पिकांचे नुकसान होत असल्याने, तो कर्ज फेडू शकला नाही. यामुळे ती बऱ्याच काळापासू एकटे आणि नैराशात होता.
हे ही वाचा : शेळ्या चरायला घेऊन गेलेल्या मुलीवर झुडपात सामूहिक अत्याचार, पीडित तरुणी शेतात आढळली
सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्याने स्वत:ला संपवलं, शेतकऱ्यांचा आरोप
घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण घटनेचा पंचनामा तयार करत आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. शेतकऱ्यांनी सरकारकडे पीक कर्ज माफ करण्याची मागणी केली होती, परंतु सरकारने 2 लाखांचे कर्ज माफ केले. या सरकारच्या धोरणाने शेतकरी दत्ताराव माखणे यांना आत्महत्या करण्याच भाग पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
ADVERTISEMENT











