जालना : अंत्यविधीसाठी आलेल्या 55 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या, घटनेनं शहर हादरलं

मुंबई तक

• 06:10 PM • 27 Apr 2026

Jalna crime : जालन्यात अंत्यविधीसाठी आलेल्या एका 55 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केली. हा धक्कादायक प्रकार गोंदेगाव शिवारात घडला होता, या घटनेनं जालना शहर हादरून गेले आहे. संबंधित प्रकरणातील हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे.

Jalna crime

Jalna crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अज्ञात व्यक्तीकडून दराडेंवर हल्ला 

point

मृत दराडेचा मुलगा पवनच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल 

Jalna Crime : गौरव साळी - जालन्यात अंत्यविधीसाठी आलेल्या एका 55 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केली. हा धक्कादायक प्रकार गोंदेगाव शिवारात घडला होता, या घटनेनं जालना शहर हादरून गेले आहे. संबंधित प्रकरणातील हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे. मच्छिंद्र दराडे (वय 55) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दराडे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी आले असता, नंतर ते एका व्यक्तीसोबत बाहेर गेले. त्याचक्षणी एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर दगडाने हल्ला केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : भयंकर... मीरारोडमध्ये धर्म विचारून चाकूने भोसकले, अवघ्या परिसरात प्रचंड भीती!

अज्ञात व्यक्तीकडून दराडेंवर हल्ला 

अज्ञात व्यक्तीने केलेला हल्ला इतका भीषण होता की, दराडे हे जागीच मृत पावले. घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिकांना तात्काळपणे पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. प्रकरण पाहून जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचे एकूण गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. 

मृत दराडेचा मुलगा पवनच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल 

घटनास्थळाचा तपास करत प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. मच्छिंद्र दराडे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, ही माहिती अद्याप समोर आली नाही. या प्रकरणी मृताचा मुलगा पवन दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. संबंधित प्रकरणाचा पोलीस शोध घेत आहेत. 

हे ही वाचा : चार तरुणांनी 'आंटी आय लव्ह यू' म्हणत महिलेला भररस्त्यात छेडलं, ती भडकली अन् मग सुरु झाला भयंकर खेळ

अशातच नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या व्यक्तीची हत्या होते, यावरून भलतीय संशयाची पाल चुकचुकतेय.  या हत्येमुळे घटनास्थळी एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनं जालना जिल्हा हादरून गेला आहे. संबंधित प्रकरणात पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.