बीड : 80 हजारांची मागणी, बार्गेनिंग करुन 60 हजार ठरले, API आणि पोलीस कॉन्स्टेबलला लाच घेताना पकडलं

Beed Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांनी एका वाळू माफियाकडे कामाच्या बदल्यात 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर झालेल्या तडजोडीअंती 60 हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. यातील 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता पोलीस कॉन्स्टेबल सुरवसे याच्याकडे देण्याचे निर्देश संदीप पाटील यांनी दिले होते.

Beed Crime News

Beed Crime News

मुंबई तक

• 12:34 PM • 11 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीड : 80 हजारांची मागणी, बार्गेनिंग करुन 60 हजार ठरले

point

API आणि पोलीस कॉन्स्टेबलला लाच घेताना पकडलं

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) संदीप पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल सुरवसे यांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही सापळा लावून यशस्वी कारवाई केली आहे. या दोन्ही आरोपींच्या विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांनी एका वाळू माफियाकडे कामाच्या बदल्यात 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर झालेल्या तडजोडीअंती 60 हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. यातील 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता पोलीस कॉन्स्टेबल सुरवसे याच्याकडे देण्याचे निर्देश संदीप पाटील यांनी दिले होते.

हेही वाचा : 'तुझ्या पतीला मारुन टाकलं, मृतदेह पुलाखाली आहे', हत्येनंतर प्रियकराने दिली अपडेट; पत्नीनेच थंड डोक्याने कट रचला

ठरल्याप्रमाणे 50 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस कॉन्स्टेबल सुरवसे याला ताब्यात घेतले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार संदीप पाटील असल्याचे स्पष्ट झाल्याने विभागाने त्यालाही तात्काळ ताब्यात घेतले आहे. वाळू उपसा आणि वाहतुकीच्या संदर्भात ही लाच मागितल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून या कारवाईमुळे अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणातील सर्व पुरावे आणि तपासाचे दस्तऐवज गोळा केले असून दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. पोलीस दलातील जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्यानेच लाचेची मागणी केल्याने जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांनी न्यायालयात आवश्यक तो अहवाल सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

CRPF जवानाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, हॉटेल बुक करुन स्वत:च्याच अल्पवयीन मुलींवर करायचा अत्याचार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
 

    follow whatsapp