Mumbai News : म्हाडाने आयोजित केलेल्या 2,640 घरांच्या विक्री सोडतीसाठी अर्ज करण्याची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडा प्रशासनाने या सोडतीसाठी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला आता अधिकृतपणे मुदतवाढ जाहीर केली आहे. अर्ज करताना आलेल्या तांत्रिक अडचणी आणि अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
ADVERTISEMENT
कधीपर्यंत वाढवली मुदत?
या नव्या घोषणेनुसार, म्हाडाच्या मुंबईतील विविध गृहप्रकल्पांमधील घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता 14 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक अर्जदारांना 14 मे रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करता येतील. गृहस्वप्नपूर्तीची ही नवीन संधी गमावू नका, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे. तांत्रिक कारणांमुळे किंवा वेळेअभावी ज्यांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ अत्यंत मोलाची ठरणार आहे. या घरांची सोडत 5 जून रोजी होणार आहे.
हे ही वाचा : विधान परिषद निवडणूक: काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, ठाकरेंच्या उमेदवाराबाबत केली मोठी घोषणा
'असा' करा अर्ज
नागरिकांनी आता अधिक विलंब न करता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी https://housing.mhada.gov.in या अधिकृत पोर्टलचा वापर करावा. या संकेतस्थळावर अर्जासंबंधीची सर्व सविस्तर माहिती, अटी आणि शर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. म्हाडाच्या या सोडतीला मुंबईकरांकडून नेहमीच मोठा प्रतिसाद मिळत असतो, त्यामुळे या वाढीव मुदतीत अर्जांचा ओघ आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा : 'शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती..' बच्चू कडूंची मोठी घोषणा; प्रहार संघटनेचं काय होणार?
'या' ठिकाणी मिळणार घरं
म्हाडातर्फे लॉटरी काढण्यात आलेली ही घरे गिरगाव, दादर, वडाळा, माझगाव, पवई, चेंबूर, गोरेगाव, वांद्रे, विक्रोळी, घाटकोपर या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.
ADVERTISEMENT











