RBI Recruitment : भारतीय रिझर्व्ह बँकेत (RBI) करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँकेने 'ऑफिसर ग्रेड-बी' पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR)-जनरलच्या 40 जागा, DEPR विभागासाठी 10 जागा आणि DSIM विभागासाठी 10 जागांचा समावेश आहे. संपूर्ण भारतात कोठेही नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांसाठी ही एक प्रतिष्ठित संधी मानली जात आहे.
ADVERTISEMENT
पात्रतेचे निकष
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे निश्चित करण्यात आली आहे. 'जनरल' पदासाठी उमेदवाराकडे किमान 60% गुणांसह पदवी किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे (राखीव प्रवर्गासाठी सवलत लागू). DEPR पदासाठी अर्थशास्त्र किंवा वित्त विषयातील पदव्युत्तर पदवी, तर DSIM पदासाठी सांख्यिकी, गणितीय अर्थशास्त्र किंवा इकोनोमेट्रिक्स यांसारख्या विषयांतील पदव्युत्तर पदवी असणे अनिवार्य आहे. अर्जदाराचे वय 1 एप्रिल 2026 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे, तर सरकारी नियमांनुसार SC/ST उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
हे ही वाचा : विधान परिषद निवडणूक: काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, ठाकरेंच्या उमेदवाराबाबत केली मोठी घोषणा
अर्जाचे शुल्क
भरती प्रक्रियेसाठी अर्जाचे शुल्क प्रवर्गानुसार निश्चित केले आहे. जनरल, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना 1003 रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी हे शुल्क केवळ 118 रुपये इतके आहे. इच्छुक उमेदवारांना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्जामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी उमेदवारांनी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासूनच अंतिम सबमिट करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा : 'शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती..' बच्चू कडूंची मोठी घोषणा; प्रहार संघटनेचं काय होणार?
शेवटची तारीख काय?
या भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखांची नोंद घेणे उमेदवारांसाठी अत्यंत आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे (संध्याकाळी 6 वाजेपर्यंत) असून, त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. या पदांसाठीची लेखी परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाईल, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यातील परीक्षा 13 व 14 जून 2026 रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 25 व 25 जुलै 2026 रोजी आयोजित केली जाणार असल्याचे अधिकृत जाहिरातीत सांगण्यात आले आहे. जाहिरता पाहण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी www.rbi.org.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
ADVERTISEMENT











