Maharashtra Weather : राज्यात सूर्य आग ओकणार, 5 जिल्ह्यांना उन्हाचा यलो अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 12 Mar 2026

maharashtra weather : राज्यात उन्हाचा पारा चांगलाच तापलेला दिसून येत आहे. 12 मार्च रोजी राज्यातील हवामान उष्ण आणि दमट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विशेषकरून कोकण, मराठवाडा, आणि विदर्भात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील एकूण 5 जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

maharashtra weather

maharashtra weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात उन्हाचा पारा चांगलाच तापला

point

12 मार्च रोजी राज्यातील हवामान उष्ण आणि दमट राहील

point

जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा पारा चांगलाच तापलेला दिसून येत आहे. 12 मार्च रोजी राज्यातील हवामान उष्ण आणि दमट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विशेषकरून कोकण, मराठवाडा, आणि विदर्भात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील एकूण 5 जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सुनेनं सासूच्या तोंडात कोंबला बोळा अन् गुप्तांगात टाकली मिरचीची पूड, नंतर घडलं भलतंच...

कोकण : 

कोकणात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र : 

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान उष्ण आणि कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच पुण्यातही हावमान तापणार असून तेथील तापमान हे कमाल 35-38 अंश सेल्सियस तर किमान 18-21 अंश सेल्सियस तापमान राहील.

मराठवाडा : 

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये हवामान उष्ण आणि कोरडं राहण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : Stuti Sonawane Suicide Case : ताज हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेशन, आनंदी ठेवलं, पण अचानक फैजुलचा स्वभाव बदलला

विदर्भ : 

विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये उन्हाच्या झळा अधिक असतील. याच विभागात कमाल 36-40 अंश तर किमान 21-24 अंश सेल्सियस तापमानाचा अंदाज राहण्याची शक्यता आहे.