अनैतिक संबंधाचा वाद टोकाला पोहचला? अभिनेत्रीच्या पतीनेच पेपर स्प्रे मारून केले चाकूने वार अन्...

बंगळूरूमधील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि प्रायव्हेट चॅनेलच्या अँकरवर तिच्या पतीने क्रूर हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे.

अभिनेत्रीच्या पतीनेच पेपर स्प्रे मारून केले चाकूने वार अन्...

अभिनेत्रीच्या पतीनेच पेपर स्प्रे मारून केले चाकूने वार अन्...

मुंबई तक

• 11:09 AM • 13 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

अभिनेत्रीच्या पतीनेच तिच्यावर केला क्रूर हल्ला

point

पेपर स्प्रे मारून केले चाकूने वार अन्...

point

बंगळुरूच्या टी.व्ही अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?

बंगळूरूमधील टी.व्ही इंडस्ट्रीशी जोडलेल्या अभिनेत्री संदर्भात एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. या प्रकरणात प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि प्रायव्हेट चॅनेलची अँकर मंजुळा उर्फ श्रुतीवर तिच्या पतीने क्रूर हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. ही भयानक घटना 4 जुलै रोजी हनुमंतनगर पोलिस स्टेशन परिसरातील मुनेश्वर लेआउटमध्ये घडली. आता यासंदर्भातील नवी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या पतीला तिच्यावर अनैतिक संबंधाचा संशय होता आणि त्यामुळेच त्याने श्रुतीवर हल्ला केला असल्याचा अंदाज बांधला जात आहे. 

हे वाचलं का?

अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम

खरंतर, श्रुतीने 'अमृतधारा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेसह अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती तिचा पती अंबरीशपासून वेगळी राहत होती. 20 वर्षांचे वैवाहिक जीवन आणि दोन मुलं असूनही दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. कौटुंबिक आणि आर्थिक वादांमुळे श्रुती एप्रिलमध्ये तिच्या भावाच्या घरी राहायला गेली.

हे ही वाचा: मोठी बातमी! पराभूत झालेल्या उज्ज्वल निकम यांची राज्यसभेचे खासदार म्हणून नियुक्ती

आधी पेपर स्प्रे मारला अन् नंतर चाकूने वार...

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रुतीने यापूर्वी अंबरीशविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी भाडेपट्ट्याच्या पैशांवरून त्यां दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर तीन महिन्यांनंतर गेल्या गुरुवारी श्रुती आपल्या पतीच्या घरी गेली होती आणि त्यावेळी त्यांनी पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी अंबरीशने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. मुलं कॉलेजला गेल्यानंतर अंबरीशने श्रुतीच्या शरीरावर आधी पेपर स्प्रे मारला त्यानंतर त्याने तिच्या छातीवर, मांडीवर आणि मानेवर धारदार शस्त्राने बरेच वार केले.

हे ही वाचा: Mumbai Crime: दारूच्या नशेत तरुणावर चाकूने वार... भावांनी मिळून भररस्त्यात संपवलं!

अभिनेत्रीवर उपचार सुरू 

इतकेच नव्हे तर त्याने श्रुतीचं डोकं भिंतीवर आपटलं. श्रुतीला त्यानंतर गंभीर अवस्थेत व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आलेत. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची बातमी मिळाली आहे. हनुमंतनगर पोलिसांनी आरोपी अंबरीशला अटक असून त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीच्या तपासात कौटुंबिक आणि आर्थिक वाद हेच हल्ल्यासाठी कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात कारवाई केली जात आहे. 

    follow whatsapp