Mumbai Crime: दारूच्या नशेत तरुणावर चाकूने वार... भावांनी मिळून भररस्त्यात संपवलं!
मुंबईतील वडाळा बस डेपो परिसरात दारूच्या नशेत असलेल्या दोन भावांनी मिळून एका 32 वर्षीय तरुणाची चाकूने वार करत हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दारूच्या नशेत केली तरुणाची हत्या

दोन भावांनी मिळून चाकूने केले वार अन्...

वडाळा बस डोपो परिसरात भरस्त्यात तरुणाची हत्या
Mumbai Crime: मुंबईतील वडाळा बस डेपो परिसरात धक्कादायक घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. दारूच्या नशेत असलेल्या दोन भावांनी मिळून एका 32 वर्षीय तरुणाची चाकूने वार करत हत्या केली. यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव निखिल सकाराम लोणडे असल्याचं समोर आलं आहे. जुन्या वादातून तसेच दारूच्या नशेत दोघांनी निखिलवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे.
भावांनी मिळून तरुणाला संपवलं
आरएके मार्ग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भावांची ओळख कल्पेश कुदतरकर (29) आणि योगेश कुदतरकर (31) असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनी एका जुन्या वादातून आणि दारूच्या नशेत पीडित तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी दोन तासांत आरोपींना अटक केली. वडाळा बस डेपो परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जुन्या वादातून हत्या...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी मृत तरुण निखिल लोणडे आणि त्याची हत्या करणारे दोन्ही आरोपी अनेक गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार, निखिलची हत्या जुना वाद आणि दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून झाली असावी.
हे ही वाचा: बीड जिल्ह्यात चाललंय तरी काय? माजी सरपंचाकडून धारदार कोयत्याने तरुणाच्या डोक्यात सपासप वार, कारण ऐकून बसेल धक्का
पोलिसांचा तपास
या प्रकरणामध्ये परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण तयार झालं आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून हत्येमध्ये वापरण्यात आलेलं शस्त्र जप्त करण्यात आलं आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असून लवकरच सत्य समोर येईल.
हे ही वाचा: एकतर्फी प्रेमाचा भयंकर शेवट! पतीसोबत झोपलेल्या महिलेवर कुऱ्हाडीने केले सपासप वार, आरोपी इन्स्टाग्रामवर..
18 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू
पोलिसांच्या रिपोर्टनुसार, काही माहिन्यांपूर्वी फ्रेब्रुवारी महिन्यात मृत निखिल लोणडेच्या 18 महिन्यांच्या मुलाचा रस्त्यावरील अपघातात मृत्यू झाला होता. रस्त्यावर कारच्या खाली येऊन चिरडून त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि हत्येमागे आणखी काही कारण किंवा कोणता कट रचला होता का? याचा तपास सुरू आहे. मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर आता निखिलची हत्या झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.