पालघरमध्ये मोठी दुर्घटना, विषारी वायू गळतीमुळे नागरिकांमध्ये घबराट; 2600 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन

Palghar Gas Leak : पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीमध्ये असलेल्या भगेरिया केमिकल कंपनीत 'ओलियम' या घातक वायूची गळती झाल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्लॉट क्रमांक D-17 मध्ये स्थित असलेल्या या कंपनीत अचानक लागलेल्या आगीनंतर ही वायूगळती सुरु झाली. या वायू गळतीचे स्वरुप इतके भाषण होते की, कंपनीपासून सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना डोळ्यांत जळजळ, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Palghar Gas Leak

Palghar Gas Leak

मुंबई तक

03 Mar 2026 (अपडेटेड: 03 Mar 2026, 12:51 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पालघरमध्ये मोठी दुर्घटना

point

विषारी वायू गळतीमुळे घबराट

point

2600 लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन

Palghar Gas Leak, मोहम्मद हुसैन खान : पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीमध्ये असलेल्या भगेरिया केमिकल कंपनीत 'ओलियम' या घातक वायूची गळती झाल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्लॉट क्रमांक D-17 मध्ये स्थित असलेल्या या कंपनीत अचानक लागलेल्या आगीनंतर ही वायूगळती सुरु झाली. या वायू गळतीचे स्वरुप इतके भाषण होते की, कंपनीपासून सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना डोळ्यांत जळजळ, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. वायूगळतीमुळे हवेत धुराचे लोट पसरले असून स्थानिक रहिवासी आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'त्या' 2 रिल्स बाहेर येऊ द्यायच्या नसतील तर नरेंद्र मोदी यांनी खुर्ची खाली करावी, प्रकाश आंबेडकरांच्या ट्वीटने खळबळ

सर्वत्र धुराचे साम्राज्य

वायूगळतीची माहिती मिळताच खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. तारापूर विद्यामंदिर या शाळेतील 1600 विद्यार्थ्यांना तातडीने रेस्क्यू करण्यात आले, तर 1 हजारहून अधिक कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तसेच भगेरिया कंपनीच्या परिसरातील इतर कारखान्यांमधील कामगारांना सुरक्षितरीत्या बाहेर काढून हा परिसर रिकामा करण्यात आला आहे. तसेच, कंपनीपासून काही अंतरावर असलेल्या एमआयडीसी निवासी वसाहतीमधील नागरिकांनाही सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. वायूगळतीमुळे सर्वत्र धुराचे साम्राज्य निर्माण झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली असून लोकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे.

जीवितहानीचे वृत्त नाही

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान वायूगळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सुदैवाने, आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

बोईसर-तारापूर एमआयडीसी क्षेत्रात वारंवार होणाऱ्या अशा औद्योगिक अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण आहे. वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. सध्या मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, वायूगळती पूर्णपणे थांबल्यानंतरच परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. या अपघातामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा : अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला, इराणचे जोरदार प्रत्युत्तर; सौदी अरेबियातील अमेरिकेन दूतावासदेखील जळाले

वायू गळतीवर यशस्वी नियंत्रण

या घटनेनंतर सुमारे तीन तासांनंतर, ओलियम गॅस साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टाकीतून होणारी गळती यशस्वीरित्या आटोक्यात आणण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने वायू गळतीवर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवले आहे. एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कंपनीतील पाच कामगारांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. ही माहिती पालघर प्रशासनाने दिली आहे.
 

    follow whatsapp