पुणे हादरलं! पान खाणाऱ्या तरुणावर कोयत्याने सपासप वार, वाद काय?

Pune Crime : पुण्यातील कात्रज येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पानपट्टीवर झालेल्या शुल्लक भांडणावरून एका तरुणाने कोयत्याने सपासप वार केले.

Pune Crime
Pune Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील पान टपरीवर नेमकं काय घडलं?

point

तरुणाला कसं केलं ठार?

Pune Crime : पुणे शहर हे गुन्हेगारीचं हॉट्सस्पॉट बनत असल्याच्या चर्चा आहेत. कारण ग्रामीण पुणे आणि शहरी पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. पुण्यातील कात्रज येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. पानपट्टीवर झालेल्या शुल्लक भांडणावरून एका तरुणाने कोयत्याने सपासप वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात तरुण जागीच ठार झाला आहे. ही घटना कात्रजच्या साई सिद्धी चौकातील पानपट्टीवर घडली. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणातील व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं आहे. 

हेही वाचा : झीशान झाला 'समर'.. धर्मांतरणासाठी तरुणीवर दबाव, शरीरसुख अन् दीड लाखांना लुटलं...हादरवून टाकणारी घटना

काय घडलं? 

संबंधित प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात मृत झालेल्या तरुणाचे नाव आर्यन साळवे असे आहे. आर्यन हा मूळचा नाशिक येथील रहिवासी होता. तो आपल्या मामाकडे धनकवडी येथील आंबेगाव पठार येथे राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तो साई सिद्धी चौकातील पान टपरीवर पान खाण्यास गेला होता. तेव्हा ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. 

दोघांमध्ये वाद वाढू लागला असता, मोरेनं कोयत्याने आर्यनवर सपावर वार केले. या हल्ल्यानंतर आर्यन गंभीरपणे जखमी झाला. घटनास्थळी असलेल्या उपस्थितांनी पीडित तरुण आर्यनला रुग्णालयात नेलं. 

हेही वाचा : Viral Video : पतीने आपल्याच पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवले अन्...

आर्यनला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू होण्यापूर्वी डॉक्टरांनी आर्यनला मृत घोषित केलं. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात धैर्यशील मोरेला अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक प्रियांका निकम करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp