झीशान झाला 'समर'.. धर्मांतरणासाठी तरुणीवर दबाव, शरीरसुख अन् दीड लाखांना लुटलं...हादरवून टाकणारी घटना
Love Jihad Case : बाराबांकी जिल्ह्यात लव्ह जिहादचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका 30 वर्षीय महिलेला हिंदू असल्याची खोटी ओळख सांगत एका पुरूषाने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हिंदू असल्याची खोटी ओळख सांगत तरुणाकडून लव्ह जिहाद

आरोपीच्या कुटुंबाचाही होता समावेश
Love Jihad Case : उत्तर प्रदेशातील बाराबांकी जिल्ह्यात लव्ह जिहादचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका 30 वर्षीय महिलेला हिंदू असल्याची खोटी ओळख सांगत एका पुरूषाने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर विवाहाच्या खोट्या बहाण्याने तरुणीशी प्रेमसंबंध ठेवल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर त्याच पीडित तरुणीकडून मोठी रक्कम घेऊन तिची फसवणूक केली आहे. संबंधित प्रकरणात महिलेला संशय आल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याच पोलीस तपासातून सत्य समोर आल्यानंतर महिलेला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा : Viral Video : पतीने आपल्याच पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवले अन्...
नेमकं प्रकरण काय?
महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रारीत सांगितलं की, पुरूषाने दीड लाखांची फसवणूक केली. यानंतर, आरोपीची बहीण आणि मेहुण्याने हिंदू असल्याची ओळख सांगितली. पीडितेकडून सोन्याचे दागिने घेतले. महिलेला आरोपी आणि त्याच्या कुटुंबावर भलताच संशय येऊ लागला होता. पीडितेला समजलं होतं की, तिची फसवणूक होत आहे. तिने ताबडतोब बाराबांकीतील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर, पोलीस संबंधित प्रकरणात पुढील तपास करत आहे.
आरोपीवर गुन्हा दाखल
तपासादरम्यान, समोर आलेल्या माहितीमुळे पोलिसांना धक्का बसला. आरोपीने आपले झीशान हे खरे नाव लपवून समर सिंग असल्याचे भासवले आणि पीडितेला लव्ह जिहादचे शिकार बनवले. कोतवाली पोलीस ठाण्याचे एसएचओ आरके पाणा म्हणाले की, तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 69, 318 (2), आणि 61 (2) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचसोबत, उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंध कायद्यातील कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा : माणुसकीला काळीमा! शिक्षकाने विद्यार्थीनीला शरीरसुखाची केली मागणी, कॅम्पसमध्ये विद्यार्थीनीनं अंगावर रॉकेल ओतून...
आरोपच्या कुटुंबियांवरही गुन्हा दाखल
या प्रकरणात पोलिसांनी एकाच कुटुंबातील तिघांना अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपी झीशानसह त्याची बहीण शिवाली खान (वय 34), मेहुणा नदीम कुरेशी (वय 36) यांचा यामध्ये समावेश आहे. तिघांवरही महिलेची फसवणूक करत तिचा विश्वासघात केल्या प्रकरणी आरोप आहे. एवढंच नाही,तर आर्थिक शोषणाचाही आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात आता डिजिटल तपास केले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली.