दिल्लीतील तीस हजारी कोर्टातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रागाच्या भरात महिलेने आपल्या पतीसोबत हादरवून टाकणारं कृत्य केलं आहे. त्या महिलेने गरम पाण्यात लाल मिरची पावडर मिसळून पतीच्या अंगावर ओतलं. पण तिने असं का केलं आणि कोर्टाकडून तिला काय शिक्षा मिळाली? याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
1 जानेवारी 2025 रोजी दिल्लीतील नांगलोई परिसरात राहणारी ज्योती नावाची महिला तिच्या पतीसोबत त्यांच्या घरातच होती. त्यावेळी ज्योतीने आपल्या पतीच्या चेहऱ्यावर, तोंडावर आणि छातीवर लाल मिरची पावडर मिसळलेले उकळते पाणी ओतल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर त्यादिवशी ती आपल्या पतीला म्हणाली, "मला तुला ठार मारायचं आहे."
फोन घेऊन पळून गेली
या सगळ्या प्रकारानंतर ज्योतिने आणखी मोठं पाऊल उचललं. आपल्या पतीसोबत असं केल्यानंतर पतीने कोणाची मदत मागू नये, यासाठी तिने घराचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि त्याचा फोन घेऊन पळून गेली. त्यावेळी वेदनेने असह्य झालेला पती घराची खिडकी तोडून बाहेर गेला आणि मदतीसाठी जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून घरमालक तिथे पोहोचला आणि महिलेच्या पतीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पतीच्या अंगावर काही जखमा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
हे ही वाचा: प्रियकरासोबत अनैतिक संबंध; 'त्या' अवस्थेत फोटोसुद्धा काढले अन् पतीची नजर पडताच... नेमकं काय घडलं?
ज्योतीचं दुसरं लग्न
या घटनेनंतर, ज्योतीविरुद्ध नांगलोई पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि लवकरच आरोपपत्र दाखल केले. हे प्रकरण तीस हजारी न्यायालयात पोहोचले आणि त्यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश (SSJ) सौरभ कुलश्रेष्ठ यांनी सुनावणी केली. ज्योती स्वतः तिच्या पतीकडून घरगुती हिंसाचाराला बळी पडली असून 19 नोव्हेंबर 2024 रोजी ज्योतीने तिच्या पतीविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली असल्याचं सांगण्यात आलं. तिचे पहिले लग्न मोडले होतं आणि तिला एक मुलगी देखील आहे. दुसरीकडे, पतीच्या वकिलाने ज्योतिच्या जामिनाला विरोध करत म्हटले की ज्योतीने तिच्या पहिल्या लग्नाचं आणि मुलीचं सत्य तिच्या पतीपासून लपवलं होतं. यामुळे नात्यात मोठी फसवणूक होती. ज्योतीचे वर्तन धोकादायक असून तिला जामीन दिल्याने पीडित पती आणि साक्षीदारांना धोका निर्माण होईल, असं संबंधित पतीच्या वकिलाने सांगितलं.
हे ही वाचा: माणुसकीला काळीमा! शिक्षकाने विद्यार्थीनीला शरीरसुखाची केली मागणी, कॅम्पसमध्ये विद्यार्थीनीनं अंगावर रॉकेल ओतून...
ज्योतिला जामीन मिळाला
9 जुलै 2025 रोजी न्यायालयाने ज्योतीला 30,000 रुपयांचा दंड ठोठावून नियमित जामीन मंजूर केला. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ज्योतीला जामीन देण्याचा निर्णय घेतला. न्यायाधीशांच्या मते, खटल्याची स्थिती लक्षात घेऊन आणि ज्योती पीडित पती किंवा साक्षीदारांना इजा पोहोचवू नये याची खात्री करून तिला जामीन मंजूर केला जाऊ शकतो. कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून न्यायालयाने कठोर अटी घातल्या.
ADVERTISEMENT
