प्रियकरासोबत अनैतिक संबंध; 'त्या' अवस्थेत फोटोसुद्धा काढले अन् पतीची नजर पडताच... नेमकं काय घडलं?
दिल्लीमधील एका महिलेने लग्नानंतर दुसऱ्याच पुरुषासंबंध शारीरिक संबंध ठेवले. संबंध बनवताना महिलेने आपल्या प्रियकरासोबत इन्टिमेट म्हणजेच आक्षेपार्ह अवस्थेत फोटोसुद्धा काढले. परंतु, असं करणं त्या महिलेला महागात पडलं. नेमकी घटना काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रियकरासोबत ठेवले अनैतिक संबंध

शारीरिक संबंध बनवतानाचे फोटो सुद्धा काढले

पतीने पत्नीच्या फोनमध्ये पाहिले 'ते' फोटोज
सध्या देशभरात विवाहित महिलांचे अनैतिक संबंध असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीतून अशीच एक बातमी समोर आली आहे. एका महिलेने लग्नानंतर दुसऱ्याच पुरुषासंबंध शारीरिक संबंध ठेवले. आपला पती बाहेर गेल्यानंतर ती आपल्या प्रियकराला भेटायची आणि त्याच्यासोबतच शारीरिक संबंध प्रस्थापित करायची. इतकेच नव्हे, तर अशाप्रकारचे संबंध बनवताना महिलेने आपल्या प्रियकरासोबत इन्टिमेट म्हणजेच आक्षेपार्ह अवस्थेत फोटोसुद्धा काढले. परंतु, असं करणं त्या महिलेला महागात पडलं. नेमकी घटना काय? सविस्तर जाणून घ्या.
प्रियकरासोबतचे इन्टिमेट फोटो पतीने पाहिले
दिल्लीतील फतेहपुर बेरी पोलीस स्टेशन परिसरात ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. ही महिला आपल्या प्रियकरासोबत फोनवर खूप बोलायची आणि बऱ्याच वेळा तिने त्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध देखील प्रस्थापित केले. महिलेच्या पतीला या सगळ्याबद्दल संशय येताच त्याने आपल्या पत्नीचा फोन चेक केला. महिलेच्या फोनमध्ये तिच्या प्रियकरासोबतचे घाणेरडे चॅट्स आणि फोटोज सुद्धा होते. पतीने हे सगळं पाहिल्यानंतर त्याने ते सगळे फोटोज आपल्या फोनमध्ये सेव्ह करून घेतले. यामुळे पत्नी खूप घाबरली.
नवऱ्याचा फोन चोरण्याचा प्लॅन
यानंतर महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून प्लॅन बनवला. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि तिच्या प्रियकराने ते फोटोज परत मिळवण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी महिलेच्या पतीचा मोबाईल चोरण्याचा प्लॅन बनवला. महिलेने तिचा प्रियकर आणि मित्राला बोलावले. त्यानंतर तिने त्या दोघांना आपल्या नवऱ्याच्या रोजच्या रूटीनची आणि कामाच्या वेळेबद्दल माहिती दिली. त्यानुसार 19 जून रोजी त्यांनी महिलेच्या नवऱ्याचा फोन चोरला आणि त्यानंतर ते पळून गेले.
हे ही वाचा: माणुसकीला काळीमा! शिक्षकाने विद्यार्थीनीला शरीरसुखाची केली मागणी, कॅम्पसमध्ये विद्यार्थीनीनं अंगावर रॉकेल ओतून...
पोलिसांनी घेतला शोध
या सगळ्या प्रकारानंतर पीसीआरला सुलतानपूर येथील मेन मार्केट रोडवरील ओल्ड यूके पेंट फॅक्टरीजवळ मोबाईल फोन चोरीच्या घटनेची माहिती देणारा फोन आल्याचं डीसीपी यांनी सांगितलं. तक्रारदाराने पोलिसांना सांगितले की "स्कूटरवरून आलेल्या दोन मास्क घातलेल्या लोकांनी त्याचा फोन हिसकावून घेतला आणि पळून गेले." पुढे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्कूटवर मागे बसलेल्या व्यक्तीने निळा टी-शर्ट घातला असल्याचं तक्रारदाराने सांगितलं. पुढे वसंत कुंज येथील एएनपीआर स्कॅन केल्यानंतर स्कूटरच्या रजिस्ट्रेशन नंबरची माहिती कळाली.
हे ही वाचा: Govt Job: मुंबईत सरकारी नोकरीसाठी बंपर भरती; 'या' मोठ्या पदांसाठी करा अर्ज...
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
ही स्कूटर दरियागंजमधून एक दिवसासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आली होती. डीसीपीच्या मते, स्कूटर भाड्याने घेतल्यावर जमा केलेल्या कागदपत्रांचा आणि आधार कार्डाशी संबधित डेटाचा वापर करून फोन चोरणाऱ्या आरोपींना राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यातील बालोत्रा येथे ट्रॅक करण्यात आले. यातील एका आरोपी अंकित गेहलोतला अटक करण्यात आली असून दुसऱ्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे.