घराबाहेर पडली अन् वाटेत घडलं भयंकर! आठ दिवसांनंतर, ऊसाच्या शेतात 17 वर्षीय पीडितेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह...
आठ दिवसांपूर्वी बँकेतून पैसे काढण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 17 वर्षीय तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याची माहिती आहे. ऊसाच्या शेतात रक्तबंबाळ अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
घराबाहेर पडली अन् वाटेत घडलं भयंकर!
ऊसाच्या शेतात 17 वर्षीय पीडितेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह...
Crime News: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. आठ दिवसांपूर्वी बँकेतून पैसे काढण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 17 वर्षीय तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याची माहिती आहे. ऊसाच्या शेतात रक्तबंबाळ अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पीडिता अचानक बेपत्ता झाल्यानंतर, कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले. अखेर, 8 दिवसांनंतर तरुणीचा भयानक अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर पोलिस स्टेशन हद्दीतील कन्नौजिया कॉलनीमध्ये राहणारी 17 वर्षीय अल्पवयीन तरुणी 24 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता बँकेतून पैसे काढण्यासाठी घराबाहेर पडली. परंतु ती रात्रीपर्यंत देखील घरी न पोहोचल्याने कुटुंबियांनी तिची चिंता वाटू लागली आणि त्यांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. कुटुंबाने सुरुवातीला असपासच्या परिसरात पीडितेचा शोध घेतला, नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली, पण काहीच पत्ता लागला नाही. त्यानंतर, सदर पोलिस ठाण्यात बेपत्ता मुलीची तक्रार दाखल करण्यात आली.
हे ही वाचा: Govt Job: 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मध्ये ऑफिसर बनण्याची संधी! महिन्याला लाखोंचा पगार अन्... लवकर करा अप्लाय!
अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह
पीडिता बेपत्ता झाल्याच्या 8 दिवसांनंतर, 3 मार्च रोजी शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुडियाखेडा गावाबाहेरील ऊसाच्या शेतात रक्ताने माखलेल्या आणि अर्धनग्न अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आजूबाजूच्या लोकांनाही याची माहिती देण्यात आली. दरम्यान, कुटुंबियांनी मृतदेह त्यांच्या मुलीचा असल्याचं ओळखले. या घटनेने पीडितेच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
हे ही वाचा: बदलापूर : मोबाईल फोनमधील मॅसेज डिलीट झाला म्हणून 36 वर्षीय मुलाने जन्मदात्या आईचाच गळा आवळला...
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आलं आणि नंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 3 मार्च 2026 रोजी उसाच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. आता, पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे प्रकरणात संबंधित कलमे जोडण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी प्रकरणात सहभागी असलेल्या तरुणाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई केली जात असल्याचं सांगितलं जात आहे.










