Govt Job: 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मध्ये ऑफिसर बनण्याची संधी! महिन्याला लाखोंचा पगार अन्... लवकर करा अप्लाय!

मुंबई तक

सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याचं अनेक उमेदवारांचं स्वप्न असतं. अशा उमेदवारांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI)कडून नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेकडून सॉफ्टवेअर डेव्हलपर, मोबाईल डेव्हलपर, आयटी ऑफिसर या पदांच्या एकूण 250 रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

ADVERTISEMENT

'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मध्ये ऑफिसर बनण्याची संधी!
'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मध्ये ऑफिसर बनण्याची संधी!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मध्ये ऑफिसर बनण्याची संधी!

point

महिन्याला लाखोंचा पगार अन्... लवकर करा अप्लाय!

Govt Job: सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याचं अनेक उमेदवारांचं स्वप्न असतं. अशा उमेदवारांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI)कडून नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेकडून सॉफ्टवेअर डेव्हलपर, मोबाईल डेव्हलपर, आयटी ऑफिसर या पदांच्या एकूण 250 रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या पदांवर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तगडा पगार मिळेल. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार centralbank.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

काय आहे पात्रता? 

या बँकेच्या भरतीसाठी पदानुसार, वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. वेब सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर पदासाठी उमेदवारांकडे BE/ B.Tech/ MTS डिग्रीसह स्केल II वर किमान 4 वर्षांचा अनुभव आणि स्केल III पदासाठी 6 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसेच, डेटा आर्किटेक्ट/ डेटा इंजीनिअरसाठी, BE/ B.Tech/ MCA पदवीसह संबंधित क्षेत्रात 4 वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे. 

डेटा गव्हर्नन्स अॅण्ड क्वालिटी पदासाठी उमेदवारांकडे बीई/ बी.टेक/ एमसीए डिग्रीसह डेटा गव्हर्नन्सशी संबंधित पदाचा 6 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. तसेच, आयटी ऑफिसर पदासाठी बीई/ बी.टेक/ एमसीए (सीएस/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स) पदवीसह 2 किंवा 4 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. यासोबतच, रिस्क मॅनेजर पदासाठी फायनान्स, स्टॅटिस्टिक्समध्ये एमबीए/ एमएमएस/ पीजी आणि 3 वर्षांचा अनुभव तसेच, टॅक्सेशन/सीए पदासाठी, चार्टर्ड अकाउंटंट (ICAI) सोबतच, उमेदवारांनी 2 संबंधित क्षेत्रात काम केलेलं असणं आवश्यक आहे.  

हे ही वाचा: व्यसनमुक्ती केंद्रात उपचाराऐवजी मारहाण! रुग्णाने औषध घेण्यास नकार दिल्याने कर्मचाऱ्यांनी मिळून केली हत्या...

कसा कराल अर्ज? 

1. उमेदवारांनी सर्वप्रथम centralbank.bank.in या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या. 
2. त्यानंतर, Recruitment सेक्शनमध्ये संबंधित भरतीच्या नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि Click Here to Apply Online वर जा. 
3. आता ibpsreg.ibps.in वर ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मची लिंक दिसेल. 
4. रजिस्ट्रेशन डिटेल्स क्रिएट करण्यासाठी बेसिक माहिती भरा.
5. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लॉगिन करून अर्ज भरण्यास सुरूवात करा. 
6. सर्व माहिती भरल्यानंतर, पासपोर्ट साइज फोटो आणि सही योग्य आकारात अपलोड करा. 
7. शेवटी, प्रवर्गानुसार अर्जाचं शुल्क भरून त्याची प्रिंटआउट काढून ती सुरक्षितरित्या ठेवा. 

हे वाचलं का?

    follow whatsapp