बदलापूर : मोबाईल फोनमधील मॅसेज डिलीट झाला म्हणून 36 वर्षीय मुलाने जन्मदात्या आईचाच गळा आवळला...
मोबाईल फोनमधील मॅसेज डिलीट झाल्याच्या कारणावरून हा वाद झाला. मात्र, काही क्षणातच हा वाद इतका टोकाला पोहोचला की आरोपी मुलाने आपल्या आईचा गळा दाबून तिला संपवण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मोबाईल फोनमधील मॅसेज डिलीट झाला म्हणून आई-मुलात वाद
36 वर्षीय मुलाने जन्मदात्या आईचाच गळा आवळला...
बदलापुरातील धक्कादायक घटना
Thane Crime: ठाणे जिल्ह्यातील बदलापूर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका मुलाने किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून आपल्याच जन्मदात्या आईचा गळा आवळून जीव घेण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल फोनमधील मॅसेज डिलीट झाल्याच्या कारणावरून हा वाद झाला. मात्र, काही क्षणातच हा वाद इतका टोकाला पोहोचला की आरोपी मुलाने आपल्या आईवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून थेट पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं.
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, 2 मार्च रोजी सकाळच्या सुमारास बदलापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. आरोपी आणि त्याची आईचा घरात वाद झाला आणि रागाच्या भरात आरोपीने त्याच्या आईवर हल्ला केला. मोबाईल फोनमधील मॅसेज डिलीट करण्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाल्याचं वृत्त आहे. पण, किरकोळ वादातून सुरू झालेल्या वादाने अचानक हिंसक वळण घेतलं.
हे ही वाचा: धर्म बदलायचा असेल तर 60 दिवस आधी...', महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय; अधिवेशनात विधेयक मांडणार
आईचा गळा घोटण्याचा प्रयत्न
संबंधित प्रकरणाबाबत पोलिसांनी पीटीआयला माहिती दिली. वृत्तानुसार, 36 वर्षीय मिलिंद व्यापारी अशी आरोपी मुलाची ओळख समोर आली असून त्याने आपल्या 56 वर्षीय आईचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, आरोपीने त्याच्या बनियानचा वापर करून महिलेचा गळा दाबला. सुदैवाने, ती महिला कशीतरी त्याच्या कचाट्यातून सुटण्यात यशस्वी झाली आणि पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
हे ही वाचा: Astrology: मार्च महिन्यात सूर्याचं तब्बल 3 वेळा संक्रमण; 'या' राशींचे लोक होतील मालामाल...
संबंधित घटनेची माहिती मिळताच, बदलापूर पूर्वेतील पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी मुलगा मिलिंदविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. सध्या, आरोपीचा तपास सुरू असून त्याच्या अटकेसाठी पोलीस छापेमारी करत असल्याचं वृत्त आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल.










