विवाहित प्रेयसीने गोड बोलून प्रियकराला पुण्याहून 'तिथं' बोलावलं, नवऱ्यासमोरच केला कांड
Nagpur Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली आणि सागर यांच्यात शिक्षण घेत असतानापासून प्रेमसंबंध होते. त्यानंतर सोनालीचे लग्न राजू गजभिये याच्यासोबत झाले आणि त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र लग्नानंतरही सोनाली आणि सागर यांच्यात संपर्क कायम होता. या प्रकरणाबाबत यापूर्वीही राजू गजभिये यांनी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्याहून होळीसाठी गावी आलेल्या तरुणाला विवाहित प्रेयसीने गोड बोलून बोलावलं
अन् नवऱ्याच्या मदतीने केला खून, नागपुरातील खापरखेडा परिसर हादरला
Nagpur Crime News : नागपुरात पत्नीने पतीसोबत मिळून प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. पुण्यावरून होळी साजरी करण्यासाठी गावी आलेल्या तरुणाचा भरदिवसा खून करण्यात आला आहे. याप्रकरणातील आरोपी पती-पत्नी करण्यात आली असून नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात गुरुवारी भरदिवसा घडलेल्या हत्येच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
काटा काढण्यासाठी इन्स्टाग्रामवर मेसेज करुन बोलावलं
अधिकची माहिती अशी की, खापरखेडा-कोराडी रोडवर एका पती-पत्नीने मिळून एका तरुणावर धारदार चाकूने अनेक वार करत त्याची हत्या केली. तपासात मृत तरुण आणि आरोपी महिलेचे प्रेमसंबंध असल्याची बाब समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव सागर वानखेडे आहे. तो पुण्यात नोकरी करत होता. होळी साजरी करण्यासाठी तो पुण्यावरून नागपुरात आपल्या गावी आला होता. या प्रकरणात पोलिसांनी राजू गजभिये आणि त्याची पत्नी सोनाली गजभिये या दोघांना अटक केली आहे.
हेही वाचा : पुणे : शाळेत टिळा लावून येण्यास मनाई, मुख्याध्यापकावर खळबळजनक आरोप; हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते आक्रमक
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली आणि सागर यांच्यात शिक्षण घेत असतानापासून प्रेमसंबंध होते. त्यानंतर सोनालीचे लग्न राजू गजभिये याच्यासोबत झाले आणि त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र लग्नानंतरही सोनाली आणि सागर यांच्यात संपर्क कायम होता. या प्रकरणाबाबत यापूर्वीही राजू गजभिये यांनी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.










