ऑनलाईन गेमिंगच्या नादात स्वत:चं आख्खं कुटुंब संपवलं, कोल्ड्रिंकमध्ये विष मिसळून कुटुंबासह प्यायला; हादरवून टाकणारं प्रकरण

मुंबई तक

Family Suicide News : ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे हसत्या-खेळत्या कुटुंबाचा अंत झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहेत. ऑनलाईन गेममधील कर्जाला कंटाळून 24 फेब्रुवारीच्या रात्री एका व्यक्तीने संपूर्ण कुटुंबासह विष प्राशन केले होते. यामध्ये त्या व्यक्तीसह त्याच्या पत्नीचा आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने त्याचा 15 वर्षाचा मुलगा यातून बचावला आहे. मात्र अल्पवयीन मुलगा पोरका झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

Family Suicide News
Family Suicide News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑनलाईन गेमिंगच्या नादात स्वत:चं आख्खं कुटुंब संपवलं

point

कोल्ड्रिंकमध्ये विष मिसळून कुटुंबासह प्यायला

point

हादरवून टाकणारं प्रकरण

Family Suicide News : ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात अनेकजण अडकत चालले आहेत. याचे भयावह दुष्परिणाम त्यांच्या कुटुंबावर होत असल्याचं दिसून येत आहे. यातून कित्येक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. याच ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे हसत्या-खेळत्या कुटुंबाचा अंत झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहेत. ऑनलाईन गेममधील कर्जाला कंटाळून 24 फेब्रुवारीच्या रात्री एका व्यक्तीने संपूर्ण कुटुंबासह विष प्राशन केले होते. यामध्ये त्या व्यक्तीसह त्याच्या पत्नीचा आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने त्याचा 15 वर्षाचा मुलगा यातून बचावला आहे. मात्र अल्पवयीन मुलगा पोरका झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मध्य प्रदेशातील शहडोल परिसरातील ही घटना आहे. 

हे ही वाचा : पुणे : शाळेत टिळा लावून येण्यास मनाई, मुख्याध्यापकावर खळबळजनक आरोप; हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते आक्रमक

ऑनलाईन गेमिंगचे व्यसन

शहडोल परिसरात राहणाऱ्या शंकर लाल गुप्ता यांना BDG आणि Aviator सारख्या ऑनलाईन सट्टा गेमचे भयंकर व्यसन जडले होते. या खेळांमध्ये ते सातत्याने पैसे हारत गेले आणि बघता बघता लाखो रुपयांच्या कर्जात बुडाले. आर्थिक विवंचना आणि कर्जदारांचा वाढता दबाव सहन न झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले. 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री त्यांनी कोल्ड्रिंकमध्ये विष मिसळून सुरुवातीला पत्नी राजकुमारी आणि मुलगी स्वाती यांना पाजले आणि त्यानंतर स्वतःही त्याचे प्राशन केले.

15 वर्षांचा मुलगा वाचला

या घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी तिघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, 25 फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान शंकर लाल आणि मुलगी स्वाती यांचा मृत्यू झाला. पत्नी राजकुमारी यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांच्यावर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते, परंतु आठ दिवसांच्या संघर्षानंतर त्यांचीही प्राणज्योत मालवली. या भीषण दुर्घटनेत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, आता केवळ 15 वर्षांचा मुलगा अनिकेत हाच जिवंत वाचला आहे. घटनेच्या वेळी तो घरी नसल्याने सुदैवाने त्याचा जीव वाचला.

हे वाचलं का?

    follow whatsapp