Maharashtra Weather : राज्यावर उष्णतेच्या लाटेचं संकट, 'या' जिल्ह्यांना महत्त्वाचा इशारा

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात एकूणच हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह इतर भागात उकाडा जाणवणार आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट जारी केला आहे. मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून काही दिवसांत तापमानात आणखी तापमान वाढण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात 6 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात एकूणच हवामान कोरडे राहण्याची शक्यता

point

कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह इतर भागात उकाडा

point

काय सांगतंय हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात एकूणच हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह इतर भागात उकाडा जाणवणार आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट जारी केला आहे. मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून काही दिवसांत तापमानात आणखी तापमान वाढण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात 6 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. 

हे ही वाचा : सॉफ्टवेअर इंजिनिअरची बायको 'त्या' गोष्टीला वैतागाली, नको ते केलं अन्...

कोकण 

कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये सध्या तापमानाचा पारा सरारीहून अधिक आहे. 6 मार्च रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश निरभ्र राहणार असून काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट जाणवेल. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने उष्ण आणि दमट स्थिती जाणवेल.

 मध्य महाराष्ट्र 

मध्य महाराष्ट्रात पुढील काही तासांत तापमानात कोणताही मोठा बदल निर्माण होणार नाही. नंतर 3 ते 4 दिवसांत, या विभागातील काही अंशाने तापमानात हळू हळू वाढ होण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत तापमानावर फार मोठा परिणाम होणार नाही. पुढील काही दिवसांत तापमानात काही अंशात वाढ होण्याची शक्यता आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp