सांगली हादरली! दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षांनंतर त्यांच्या सहकाऱ्याची हत्या, मृतदेह बॅरलमध्ये कोंबून विहिरीत फेकला
Sangli Crime News : सांगली शहरात एक धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आले आहे. दलित महासंघाचे दिवंगत जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या एका साथीदाराचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रोहित म्हैसाळे (वय 29 ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे रोहितचा खून करून त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅरलमध्ये कोंबून एका पडक्या विहिरीत टाकण्यात आला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सांगली हादरली!
दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षांनंतर त्यांच्या सहकाऱ्याची हत्या
मृतदेह बॅरलमध्ये कोंबून विहिरीत फेकला
Sangli Crime News : सांगली शहरात एक धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आले आहे. दलित महासंघाचे दिवंगत जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या एका साथीदाराचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रोहित म्हैसाळे (वय 29 ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे रोहितचा खून करून त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅरलमध्ये कोंबून एका पडक्या विहिरीत टाकण्यात आला होता.
हे ही वाचा : टीम इंडियाचे 'हे' खरे दोन 'हिरे', पराभव रोखला अन् इंग्लंडला भारत सोडायला पाडलं भाग!
दोन अल्पवयीन ताब्यात
रोहित म्हैसाळे हा दिवंगत उत्तम मोहिते यांचा जवळचा सहकारी होता. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून आणखी एक संशयित आरोपी फरार असल्याची माहिती मिळत आहे. रोहितचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
नागरिकांची मोठी गर्दी
26 फेब्रुवारी रोजी रोहितचे अपहरण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर संशयित आरोपींचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. मात्र हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबत अद्याप स्पष्टता नसून विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक, सांगली यांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी मृतदेह पाहण्यासाठी परिसरात नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.