जालना : गहू काढण्याच्या मळणी यंत्रात अडकून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू,..दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ
Jalna News : यंत्रात ओढले गेल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वतःला बाहेर काढण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, मळणी यंत्राचा वेग प्रचंड असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. तिथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनी तातडीने धाव घेत मळणी यंत्र बंद केले. परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या भीषण अपघातात हरिभाऊ यांच्या कमरेपासून वरच्या भागाला अत्यंत गंभीर दुखापत झाली होती. या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जालना : गहू काढण्याच्या मळणी यंत्रात अडकून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ
जालना : हाता तोंडाशी आलेला घास पदरात पाडून घेण्यासाठी शेतात राबणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याचा गहू काढण्याच्या मळणी यंत्रात अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे. घनसावंगी तालुक्यातील रामगव्हाण येथे ही घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हरिभाऊ सुधाकर इंगोले (वय 29 वर्षे) असे या दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. हरिभाऊ हे विठ्ठलनगर वस्ती येथील आपल्या शेतात गहू काढणीच्या कामासाठी गेले होते. सोबत ट्रॅक्टर आणि मळणी यंत्र घेऊन ते काम करत होते. गहू काढण्याचे काम वेगात सुरू असताना, अचानक अनवधानाने हरिभाऊ चालू असलेल्या मळणी यंत्राच्या कचाट्यात सापडले आणि यंत्राच्या आत खेचले गेले.
हेही वाचा : T-20 World Cup: टीम इंडियाचा नवा हिरो... सलग दोन Half Century ठोकणारा संजू सॅमसन आहे तरी कोण?
जागीच झाला मृत्यू
यंत्रात ओढले गेल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वतःला बाहेर काढण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, मळणी यंत्राचा वेग प्रचंड असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. तिथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनी तातडीने धाव घेत मळणी यंत्र बंद केले. परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या भीषण अपघातात हरिभाऊ यांच्या कमरेपासून वरच्या भागाला अत्यंत गंभीर दुखापत झाली होती. या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.










