शेतावर गवत कापायला गेली अन् होत्याचं नव्हतं झालं! नाग-नागिणच्या सर्पदंशामुळे महिलेचा जीव गेला, सापांचाही झाला मृत्यू, कारण..

Today Shocking Viral News :  उत्तरप्रदेशच्या झांसी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथील एक महिला चारा काढण्यासाठी शेतावर गेली असता, तिला नाग सापाने सर्पदंश केला.

Today Shocking Viral News

Today Shocking Viral News

मुंबई तक

• 08:21 PM • 30 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

काय आहे संपूर्ण घटना?

point

सर्पदंशामुळे महिलेचा झाला मृत्यू

point

पोलिसांकडून कारवाई सुरु

Today Shocking Viral News :  उत्तरप्रदेशच्या झांसी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथील एक महिला चारा काढण्यासाठी शेतावर गेली असता, तिला नाग सापाने सर्पदंश केला. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या लोकांनी साप पकडला आणि त्याला लाठी-काठीने मारला. या घटनेमुळं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या सविस्तर माहिती..

हे वाचलं का?

काय आहे संपूर्ण घटना?

ही घटना झांसी येथील रक्सा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिमरा येथे घडली. प्रिती यादव (40) असं मृत महिलेचं नाव आहे. निहाल यादव असं तिच्या पतीचं नाव असून त्यांना तीन मुलं आहेत. शुक्रवारी दुपारी प्रिती तिच्या घराजवळ असलेल्या शेतात गवत कापायला गेली होती.  त्यावेळी गवतात लपलेल्या नाग-नागिणीला तिचा स्पर्श झाला आणि त्या सापांनी महिलेला सर्पदंश केला.

हे ही वाचा >> सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत CM देवेंद्र फडणवीस शेवटच्या स्थानी..MOTN सर्व्हेमुळं राजकीय वर्तुळात खळबळ!

सर्पदंशामुळे महिलेचा झाला मृत्यू

सर्पदंश झालेल्या महिलेला लोकांनी रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. काही लोक सापांकडे लक्ष ठेऊन होते. पण जेव्हा प्रितीच्या मृत्यूची बातमी समोर आली तेव्हा संतप्त झालेल्या लोकांनी त्या सापांना लाठी-काठीने मारलं. 

पोलिसांकडून कारवाई सुरु

रक्सा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी राहुल राठोड यांनी या घटनेबाबत म्हटलं की, सापाने दंश केल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी म्हटलं की, याप्रकरणी तपास केला जात असून आवश्यक ती कारवाई केली जाईल. दरम्यान, मृत महिलेचा पती निहाल आणि दीर मिथून यादवने म्हटलं, प्रिती गवत कापण्यासाठी शेतात गेली होती. जिथे गवतात लपलेल्या सापाने तिला चावा घेतला. जेव्हा आम्ही चारा घेऊन पोहोचलो, तेव्हा प्रितीला तिच्या काकाने उचललं आणि रुग्णालयात नेलं. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 

हे ही वाचा >> लग्नानंतर 6 महिने नव्हते शारीरिक संबंध! तरीही राहिली गरोदर, पती संतापला अन्... प्रेमविवाह होऊन सुद्धा काय घडलं?

    follow whatsapp