लग्नानंतर 6 महिने नव्हते शारीरिक संबंध! तरीही राहिली गरोदर, पती संतापला अन्... प्रेमविवाह होऊन सुद्धा काय घडलं?

छत्तीसगढमधील बालौदाबादारमध्ये लग्नानंतर 6 महिने पती आणि पत्नीमध्ये अजिबात शारीरिक संबंध झाले नाहीत, पण तरी सुद्धा पत्नी गरोदर राहिल्याचा पतीने दावा केला. नंतर अनैतिक संबंधाच्या संशयातून संतापलेल्या संजूने भयानक कृत्य केलं. नेमकं काय घडलं?

लग्नानंतर 6 महिने अजिबात नव्हते शारीरिक संबंध! तरीही राहिली गरोदर..
लग्नानंतर 6 महिने अजिबात नव्हते शारीरिक संबंध! तरीही राहिली गरोदर..
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लग्नानंतर 6 महिने अजिबात नव्हते शारीरिक संबंध!

point

तरीही पत्नी राहिली गरोदर..

point

संतापलेल्या पतीने केलं भयंकर कृत्य

Crime News: छत्तीसगढमधील बालौदाबादारमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे 21 वर्षीय संजू निषाद नावाच्या तरुणाचा 22 वर्षीय संगीता नावाच्या मुलीसोबत प्रेमविवाह झाला होता. मात्र, पतीच्या मते, लग्नानंतर 6 महिने त्या दोघांमध्ये अजिबात शारीरिक संबंध झाले नाहीत, पण तरी सुद्धा पत्नी गरोदर राहिली. पती म्हणाला, "लग्नानंतर 6 महिने मी संगीताला स्पर्श देखील केला नाही, तरीसुद्धा ती गरोदर कशी राहिली?" नंतर अनैतिक संबंधाच्या संशयातून संतापलेल्या संजूने भयानक कृत्य केलं. नेमकं काय घडलं? 

मागील वर्षीच संजू आणि संगीताची इंस्टाग्रामवर ओळख झाली. नंतर त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. प्रेमसंबंधात असताना दोघांमध्ये जवळीक वाढत गेली आणि लग्नाआधीच संगीता गरोदर राहिली. मात्र, त्यावेळी दोघांच्या संमतीने संगीताने गोळ्या खाल्ल्या आणि गर्भपात केला. काही काळानंतर 2024 च्या अखेरीस दोघांनी प्रेमविवाह केला. लग्नानंतर सगळं काही ठिक होईल, अशी संगीताला अपेक्षा होती. मात्र, असं काहीच घडलं नाही. 

हे ही वाचा: पतीला दिल्या झोपेच्या गोळ्या, नंतर गळा दाबला अन् दांडक्याने... पत्नीने केलं भयंकर कृत्य!

लग्नानंतर पुन्हा गरोदर राहिली...

लग्नानंतर सुरुवातीचे दिवस चांगले गेले. मात्र, कालांतराने त्यांच्यातील वाद वाढत गेला. यादरम्यान, संगीता गरोदर राहिली. त्यावेळी संजूने ते बाळ आपलं मानण्यास नकार दिला. त्याने संगीतावर अनैतिक संबंधाचा आरोप घेतला आणि त्याने लग्नानंतर संगीतासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केलं नसल्याचा दावा केला. हाच संशय दोघांमधील भांडणाचं कारण ठरलं.

हे ही वाचा: नागपूर: भर रस्त्यात दहावीतील मुलीच्या छातीवर केले चाकूचे वार, अल्पवयीन मुलाने शाळेसमोरच 'तिला' संपवलं

रागाच्या भरात संजूने काय केलं? 

18 ऑगस्ट रोजी दोघांमधील भांडण टोकाला पोहचलं. त्यावेळी रागाच्या भरात संजूने संगीताचा गळा चाकूने चिरला. हत्या केल्यानंतर, घाबरून त्याने संगीताचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि जवळच्या नदीत फेकून दिला. दोन दिवसांनंतर, संगीताच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. 26 ऑगस्ट रोजी संगीताचा मृतदेह नदीच्या काठी आढळला. मृतदेहावर चाकूच्या खुणा पाहून पोलिसांना संजूवर संशय आला. चौकशीदरम्यान, संजूने त्याचा गुन्हा कबूल केला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp