पतीला दिल्या झोपेच्या गोळ्या, नंतर गळा दाबला अन् दांडक्याने... पत्नीने केलं भयंकर कृत्य!
तेलंगणाच्या हैदराबादमध्ये आरोपी पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची निर्घृणपणे हत्या केल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अनैतिक संबंधातून केली पतीची हत्या...

प्रियकरासोबत मिळून केला पतीला मारण्याचा प्लॅन
Crime News: तेलंगणाच्या हैदराबादमध्ये पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. आरोपी पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचं दाखवण्यात आलं. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून तिचा प्रियकर अद्याप फरार असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस घटनेचा तपास करत असून मृताची ओळख जेलेला शेखर अशी समोर आली आहे. तसेच, आरोपी पत्नीचं नाव चिट्टी आणि तिच्या प्रियकराचं नाव हरीश असल्याचं सांगितलं जात आहे. जेलेला शेखर त्याची पत्नी चिट्टीसोबत हैदराबाद शहरातील सरूरनगर येथील कोडंडराम नगरमध्ये राहत होता. त्यांचं लग्न 16 वर्षांपूर्वी झालं असून त्यांना दोन मुलं देखील आहेत. शेखर कॅब ड्रायव्हर होता आणि या कामातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.
पती बाहेर गेल्यानंतर दुसऱ्याच पुरुषाशी झाली ओळख...
जेलेला शेखर कधी गरज पडल्यास ड्रायव्हर म्हणून लांबच्या प्रवासाला देखील जायचा. या दरम्यान चिट्टीची हरीश नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. एके दिवशी जेलेला शेखरला त्याच्या पत्नीवर संशय आला आणि तो आपल्या पत्नीवर नजर ठेवायचा. त्यावेळी त्याला आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधाबद्दल कळलं.
विवाहबाह्य प्रेमसंबंधामध्ये अडथळा
पीडित पतीने त्याच्या पत्नीला या सगळ्याबद्दल जाब विचारला आणि तिच्या प्रेमसंबंधाला विरोध केला. त्यामुळे तो तिच्या पत्नीच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधामध्ये अडथळा ठरत होता. याच कारणामुळे आरोपी महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येची योजना आखली. पीडित पती कामावरून परतल्यानंतर तो जेवून झोपला. तो गाढ झोपेत असताना चिट्टीने हरीशला फोन केला आणि तिच्या घरी बोलावलं.