4 मुलं असलेल्या महिलेनं 5 पोरांच्या बापासोबत केलं लफडं! संधी मिळताच दोघेही झाले फरार, माहेरचे लोक गावात आले अन्..

Today Shocking News Viral :  उत्तरप्रदेशच्या पीलीभीतच्या बिलसंडा येथे एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील चार मुलं असलेल्या महिलेनं पाच मुलांच्या वडिलांसोबत अफेर केलं आणि संधी मिळताच दोघेही फरार झाले.

Extra Marital Affaire Shocking News

Extra Marital Affaire Shocking News

मुंबई तक

• 03:23 PM • 29 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

चार मुलं असलेली महिला परपुरुषासोबत झाली फरार

point

मुलांनी अनेकदा समजावलं, पण महिलेनं ऐकलंच नाही

point

त्या गावात नेमकं काय घडलं?

Today Shocking News Viral :  उत्तरप्रदेशच्या पीलीभीतच्या बिलसंडा येथे एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील चार मुलं असलेल्या महिलेनं पाच मुलांच्या वडिलांसोबत अफेर केलं आणि संधी मिळताच दोघेही फरार झाले. मुलांनी त्यांच्या आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या महिलेनं कोणाचं ऐकलं नाही. चार दिवसानंतरही फरार झालेल्या कपलचा थांगपत्ता लागला नाही. महिलेच्या पतीनं याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलीस फरार झालेल्या दोघांचा शोध घेत आहेत. 

हे वाचलं का?

पतीने ईंटगाव पोलिसांना सांगितलं की, त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. जवळपास 20 वर्षांपूर्वी त्याने एका महिलेशी लग्न केलं आणि त्याला चार मुलं झाली. चार दिवसांपूर्वी तो सकाळी शेतावर काम करण्यासाठी गेला होता. तीन मुलं शाळेत गेली होती. मोठी मुलगी घरी होती. गावतील तरुण त्याच्या घरी आला आणि पत्नीला घेऊन फरार झाला, असा आरोप करण्यात आला आहे. 

हे ही वाचा >> काय सांगता? आता DMart च्या मदतीने प्रत्येक महिन्याला कमवा लाखो रुपये! कसं ते जाणून घ्या...

मुलांनी अनेकदा समजावलं, पण महिलेनं ऐकलंच नाही आणि नंतर..

महिलेच्या पतीनं म्हटलं की, मुलांनी त्यांच्या आईला समजवण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीनं मुलांचं ऐकलं नाही आणि ती प्रियकरासोबत पळून गेली. घरी पोहोचल्यावर मुलीनं या घटनेबाबत सांगितलं. महिलेच्या माहेरचे लोकांनाही याबाबत कळलं, त्यानंतर ते गावात आले. दुसऱ्या दिवशी ईंटगाव पोलीस चौकीत जाऊन तक्रार दाखल केली. 

दरम्यान, पोलीस आता याप्रकरणाचा तपास करत आहेत. एसओ सिद्धांत शर्माने म्हटलं, याप्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.  महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितलं की, आरोपीने पत्नी म्हणून चौथ्या महिलेल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंय. याआधी त्याने गावतच एक महिला आणि अल्पवयीन मुलीला प्रेमप्रकरणात फसवलं होतं आणि तो फरार झाला होता. 

हे ही वाचा >> मुंबईची खबर: MHADA कोकण बोर्डाच्या लॉटरीची अंतिम तारीख वाढली... आतासुद्धा करू शकता अर्ज!

    follow whatsapp