काय सांगता? आता DMart च्या मदतीने प्रत्येक महिन्याला कमवा लाखो रुपये! कसं ते जाणून घ्या...
तुमचं प्रोडक्ट चांगल्या दर्जाचं असेल, तर तुम्ही ते डीमार्टसोबत पार्टनर बनून विकू शकता. जर तुमचं उत्पादन म्हणजेच प्रोडक्ट उच्च आणि चांगल्या दर्जाचं असेल, तर डीमार्ट ते लगेच स्वीकारेल. आता यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? ते पाहूया.

बातम्या हायलाइट

DMart मध्ये दर महिन्याला कमवा लाखो रुपये

DMart सोबत बिझनेस करण्याची चांगली संधी...
Business with DMart: घरातील नेहमीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी डीमार्ट (DMart) हीच अनेकांची पहिली पसंत असते. डीमार्टमध्ये नेहमीच वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते. याचं कारण म्हणजे तिथे वस्तू खूप स्वस्त दरात मिळतात. म्हणूनच लोकांना डीमार्टमधून वस्तू खरेदी करणं सोयीस्कर वाटतं. डीमार्ट लोकांच्या गरजा समजून घेऊन स्वस्त किमतीत चांगले उत्पादने प्रदान करत असल्याचं सांगितलं जातं.
कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू
डीमार्ट अशा व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदी करते जे कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू देऊ शकतात. त्यानंतर डीमार्ट ग्राहकांना त्याहूनही स्वस्त किमतीत वस्तू उपलब्ध करून देतात. या स्पर्धेमुळे ग्राहकांना खूप कमी किमतीत वस्तू मिळतात. याचा फायदा केवळ ग्राहकांनाच होत नाही तर व्यापाऱ्यांना सुद्धा चांगला नफा मिळतो. अशा पद्धतीने, तुम्ही सुद्धा डीमार्टच्या माध्यमातून नफा कमवू शकता. कसं ते सविस्तर जाणून घ्या.
तुमचं प्रोडक्ट चांगल्या दर्जाचं असेल, तर तुम्ही ते डीमार्टसोबत पार्टनर बनून विकू शकता. जर तुमचं उत्पादन म्हणजेच प्रोडक्ट उच्च आणि चांगल्या दर्जाचं असेल, तर डीमार्ट ते लगेच स्वीकारेल. आता यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? ते पाहूया.
हे ही वाचा: मुंबईची खबर: MHADA कोकण बोर्डाच्या लॉटरीची अंतिम तारीख वाढली... आतासुद्धा करू शकता अर्ज!
डीमार्टच्या वेबसाइटवर जाऊन एक फॉर्म भरावा लागेल
डीमार्ट दर मंगळवारी व्यापाऱ्यांशी संवाद साधत असल्याचं म्हटलं जातं. परंतु अलिकडेच डीमार्टने ही प्रक्रिया काही काळासाठी थांबवली होती. आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. जर तुम्हाला यात आवड असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला डीमार्टच्या वेबसाइटवर जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. https://www.dmartindia.com/partner-with-us या लिंकवर जाऊन, तुम्हाला एक फॉर्म मिळेल ज्यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि तुमच्या प्रोडक्टबद्दल माहिती विचारली जाईल. हा फॉर्म खूप सोपा आहे. तो भरून सबमिट केल्यानंतर, डीमार्टची टीम तुमच्याशी संपर्क साधेल. ते तुमच्यासाठी मंगळवारची एक वेळ निश्चित करतील. यानंतर, तुमच्या प्रोडक्टची किंमत आणि नफा यासारख्या विषयांवर चर्चा केली जाईल आणि करार केला जाऊ शकतो.
हे ही वाचा: Govt Job: आता एअरपोर्टवर कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा नोकरी... 'या' पदांसाठी लवकरच करा अर्ज!
स्वतःची जमीन किंवा घर असेल तर चांगला फायदा...
डीमार्ट आपला व्यवसाय आणखी वाढवण्याची योजना आखत आहे. म्हणून, जर तुमची स्वतःची जमीन किंवा घर असेल तर तुम्ही ते डीमार्टला विकू शकता किंवा भाड्याने देऊ शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. तुम्ही DMart वेबसाइटला भेट देऊन आणि https://www.dmartindia.com/partner-with-us या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरू शकता. फॉर्म सबमिट केल्यानंतर, DMart व्यवस्थापक तुमच्याशी संपर्क साधतील आणि कराराबद्दल बोलतील.
डीमार्ट (DMart) चे देशभरात कोट्यवधी ग्राहक आहेत आणि ते 70 हून अधिक शहरांमध्ये त्यांचे स्टोअर चालवत आहे. जर तुमच्याकडे अशी कोणतीही मालमत्ता असेल जी तुम्हाला विकायची किंवा भाड्याने द्यायची असेल, तर तुमच्यासाठी पैसे कमविण्याची ही एक चांगली संधी असू शकते. फक्त फॉर्म भरा आणि डीमार्टच्या टीमशी बोला. याचा तुम्हाला आणि डीमार्ट दोघांनाही फायदा होईल.