शिक्षक आणि शिक्षिका करत होते अश्लील चाळे, विद्यार्थिनीनं पाहिलं, नंतर तरुणीला जाळलं, नेमकं काय घडलं?
Crime News : एका सराकारी शाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विद्यार्थिनीच्या कुटुंबाने हत्येचे आरोप करत एफआरआय दाखल करण्यात आला आहे.

बातम्या हायलाइट

शिक्षकांना आक्षेपार्ह परिस्थितीत पाहिलं

इयत्ता पाचवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला जाळलं

नेमकं काय घडलं?
Crime News : एका सराकारी शाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विद्यार्थिनीच्या कुटुंबाने हत्येचे आरोप करत एफआरआय दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सांगितलं की, विद्यार्थिनीने शाळेतील पुरुष आणि महिला शिक्षकांना नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. याबाबत कोणालाही तक्रार करू नये अशी धमकी दिली जात होती. ही घटना बुधवारी सकाळी चितकोहरा कन्या विद्यालयाच्या प्रसाधनगृहात घडली. संबंधित प्रकरणात विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा : अखेर मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावर धडकले, कसं पाटील म्हणतील तसं
मृत झालेल्या विद्यार्थिनीच्या मोठ्या बहिणीने गुरुवारी सांगितलं की, ज्या दिवशी ही घटना उघडकीस आली तेव्हा विद्यार्थिनीही सकाळी 9 वाजता शाळेत निघाली होती. जेव्हा ही घटना घडली त्या घटनेची माहिती कोणीही दिली नाही. पोलिसांनी दुपारी 12 वाजता मुलीला काहीतरी भाजलं असल्याची माहिती कुटुंबाला देण्यात आली होती.
मृत विद्यार्थिनीच्या बहिणीचे गंभीर आरोप
मोठ्या बहिणीनं आरोप केला की, शाळेतील एका शिक्षिकेनं विद्यार्थिनीशी गैरवर्तन केलं. विद्यार्थिनीने एका शिक्षकाला आणि शिक्षिकेला घाणेरडं कृत्य करताना पाहिलं होतं. त्यानंतरच, शिक्षिकेनं तिला तक्रार न करण्याची धमकी दिली होती. शुक्रवारी जूम्म असल्याने आणि पुढील दोन दिवस सुट्ट्या असल्याने विद्यार्थिनी शाळेतच गेली नाही.
हे ही वाचा : 'सरकार आरक्षण देत नाही...' शेतकऱ्याची रस्त्यावर गळफास घेत टोकाची भूमिका, सुसाईड नोटची गावभर चर्चा?
मृत विद्यार्थिनीच्या वडिलांचे गंभीर आरोप
मित्रांच्या म्हणण्यांनुसार, विद्यार्थिनी बुधवारी मुख्यध्यापकांना याबाबत सर्व घडलेला प्रकार सांगणार होती. मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी आरोप केला की, शाळेतील शिक्षक हे मुलीच्या हत्येत सहभाग आहेत. त्यांनी न्यायाची मागणी केली. पीडितांना न्याय द्यायचा सोडून त्यांच्यावर अत्याचार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.